Ramdas Kadam | ‘वैभव खेडेकरांच्या आरोपांना भीक घालत नाही, ते मनसेचे की राष्ट्रवादीचे?’ असा खेडच्या जनतेला प्रश्न – रामदास कदम

खेड : Ramdas Kadam | कोकणातील खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. कदम यांनी या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, वैभव खेडेकर (-vaibhav khedekar) मनसेचे (mns) आहेत की राष्ट्रवादीचे (ncp) आहेत? असा संभ्रम खेडच्या (khed, ratnagiri) जनतेला पडला आहे. मी त्यांच्या आरोपाना भीक घालत नाही. खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत.

रामदास कदम (shivsena mla ramdas kadam) यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, माझी बदनामी करण्यासाठी जनमानसामध्ये, माझ्या पक्षामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये माझ्या बाबतीत गैरसमज पसरवुन आपली राजकीय पोळी भाजुन घेण्यासाठी खेडेकर यांनी बेछुटपणे आरोप केले आहेत. त्यांचा मी धिक्कार करीत असुन तीव्रपणे निषेध करीत आहे. त्यांच्या विरोधात जे आरोप केले होते, त्या संदर्भात ते न्यायालयात गेले होते.

त्यांच्या विरोधात निकाल लागला तर 1 महिन्यांसाठी त्यांना स्थगिती दिली आहे. त्याचा विपर्यास करून जणू काय न्यायालयाने त्यांना क्लीन चीट दिली असे भासवून शिमगा सण त्यांनी साजरा केला, याचे मला आश्चर्य वाटते, कदम यांनी म्हटले आहे.

प्रत्युत्तर देताना कदम यांनी म्हटले आहे की, इंधन घोटाळा कोणी केला? नगरपरिषदेच्या पैशांची लूट कोणी केली? हे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी सांगावे, पुढे चौकशीमध्ये काय ते निष्पन्न होईलच. किरीट सोमय्या यांना भेटून अनिल परब यांच्या हॉटेलची तक्रार केली हा जावईशोध वैभवरावानी लावलेला दिसतो. फक्त आमच्या कुटुंबांमध्ये भांडणे लावण्यासाठी हे कट कारस्थान आहे.

मी कडवा शिवसैनिक आहे. मी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे स्वप्न वैभव खेडेकर यांना पडले असावे किंवा विधानसभेच्या निवडणुकिच्या वेळी मातोश्रीच्या पायर्‍या व माजी पालकमंत्र्यांच्या पायर्‍या ज्यांनी शिवसेनेतुन तिकीट मागण्यासाठी झिजवल्या ’त्या’ नेत्याच्या मैत्रीचा हा परीणाम असावा असे वाटते, असे कदम यांनी माजी आमदार संजय कदम यांचे नाव न घेता म्हटले आहे.

कदम यांनी पुढे म्हटले आहे की, निवडणुकी पुर्वीच मी पत्रकार परिषद घेऊन यापुढे मी कोणतेही पद घेणार
नाही असे जाहिर केले होते.
त्यामुळे मंत्री होण्याचा व नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
तमाम महाराष्ट्रातील जनता रामदास कदम यांना चांगली ओळखते.
महाराष्ट्राने, कोकणाने व शिवसेनेने माझ्यावर भरभरुन प्रेम केले आहे.
त्याची परतफेड या जन्मी होऊ शकणार नाही.

कदम यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, अशा बिनबुडाच्या आरोपांना मी भीक घालत नाही.
आकाशाकडे बघुन थुकले कि थुंकी आपल्याच तोंडावर उडते याचे भान वैभव खेडेकर यांना नाही.
शेवटी सत्य जनतेपुढे येईलच आणि भ्रमाचा भोपळा फुटेल.
नगराध्यक्ष खेडेकर यांनी केलेल्या आरोपांना रामदास कदम यांनी दिलेल्या तडाखबाज प्रत्युत्तरामुळे प्रत्यारोपांनी
कोकण आणि खेडचे राजकीय वातावरण तापणार असे दिसत आहे.

हे देखील वाचा

Section 144 In Kolhapur | किरीट सोमय्यांचा कोल्हापूर दौरा ! जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Ramdas Kadam | shivsena leader mla ramdas kadam criticizes vaibhav khedekar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update