Ramdas Kadam | श्रीलंका, लंडन आणि सिंगापूरला कोणाची हॉटेल आहेत? सर्व उघड करणार, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना इशारा

0
241
Ramdas Kadam | shivsena shinde group leader ramdas kadam criticizes on uddhav thackeray in ratnagiri khed
file photo

खेड/रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – रत्नागिरीच्या खेड येथील गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेत रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. एकदिवस नक्की समोर येईल की, सिंगापूर, श्रीलंका, अमेरिकेला कुणाचे हॉटेल आहेत हे समोर आणल्याशिवाय हा रामदास कदम (Ramdas Kadam) शांत बसणार नाही, असा इशारा कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

 

दाऊदला देखील घाबरलो नाही
शिवसेनेसाठी (Shivsena) अनेक लोकांना आम्ही अंगावर घेतलं. नारायण राणे (Narayan Rane) यांनी ज्यावेळी शिवसेना सोडली त्यावेळी मला गाडीत पुढं घेतल्याशिवाय वर्षभर उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नव्हते. काही झालं तर पहिली गोळी रामदास कदम खाईल याची आमची तयारी होती. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) रामदास कदमांसारख्या वाघाला सांभाळायचे. पण उद्धव ठाकरे सुभाष देसाई (Subhash Desai) सारख्या शेळीला सांभाळत आहेत. दाऊदला देखील घाबरलो नाही तर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) सारख्यांना तुम्ही घेऊन येत आलात तर आम्ही घाबरणार नाही, असा टोला रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

 

म्हणून मला गुहागरमध्ये पाडलं
विरोधी पक्षनेता हा भावी मुख्यमंत्री होऊ शकतो. परंतु, मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून 2009 ला उद्धव ठाकरे यांनी मला पाडलं. त्यावेळी दापोली मतदारसंघातून मी तिकीट मागितलं, मात्र मला गुहागरमधून तिकीट देऊन पाडलं. उद्धव ठाकरे यांनी मला त्यावेळी गाफील ठेवून धोका दिला. दापोलीत योगेशला पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले. योगेश कदमांना (Yogesh Kadam) कसं संपवायचं या कटात उद्धव ठाकरे सामील होते, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला.

कोकणाची जनता शिंदे यांच्या मागे
कोकणाची जनता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिमागे ठाम उभा आहे हे आज येथील जनतेने दाखवून दिले आहे.
दिवसरात्र काम करणारे शिंदे हा राज्याला लाभलेले पहिले मुख्यमंत्री आहेत, अशी स्तुती रामदास कदम यांनी यावेळी केली.

 

Web Title :- Ramdas Kadam | shivsena shinde group leader ramdas kadam criticizes on uddhav thackeray in ratnagiri khed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chhagan Bhujbal | ‘फडणवीसांना ‘या’ पदावर बघायला आवडेल’, छगन भुजबळांनी सांगितली ‘मन की बात’

Aaditya Thackeray | दीपक केसरकारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ते तर माझ्या आजोबांकडे…’

Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून आरोपीचा पलायन करण्याचा प्रयत्न, पण…