Ramdas Kadam | अर्जुन खोतकर इतका घाबरट कधीपासून झाला ? – रामदास कदम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या घरावर ईडीची धाड (ED Raid) पडली आहे. ईडीचे अधिकारी सकाळी सातच्या सुमारास राऊतांच्या मुंबईतील घरी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झाले. गेल्या 7 तासांपासून राऊत यांची चौकशी सुरु आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात (Patra Chaal Land Scam Case) ईडीकडून ही चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटातील नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांवर तोफ डागली. यावेळी रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या भूमिकेवर भाष्य केलं.

 

रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले, राष्ट्रवादीकडून (NCP) शिवसेनेला पद्धतशीरपणे संपवण्याचे प्रयत्न सुरु असताना राऊत गप्प होते. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीला 57 टक्के निधी मिळत होता. परंतु त्यावेळी राऊत शांत होते. शिवसेना संपली तरी चालेल, पण राष्ट्रवादीवर काहीच बोलायचं नाही अशी त्यांची भूमिका होती. राऊतांनी शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीसाठी अधिक काम केल्याची घणाघाती टीका कदम यांनी केली.

जालन्याचे शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी काल शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला.
माझ्यावर आणि कुटुंबावर दबाव असल्यानं शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे सांगितले.
आपण ही बाब उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सांगित्याचंही खोतकरांनी सांगितले.
यावर भाष्य करताना रामदास कदम म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मला खोतकरांचा फोन आला होता.
मी मतदारसंघात जातोय. तिथे जाऊन लोकांशी, पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेईन, असं त्यावेळी त्यांनी सांगितल्याचे कदम यांनी सांगितले.

 

दबाव असल्यानं शिंदे गटात जात असल्याचं खोतकरांनी जाहीरपणे सांगितले. यावर कदम यांना विचारले.
खोतकर इतका घाबरट कधीपासून झाला, असा प्रतिप्रश्न कदम यांनी केला.
त्यांनी पैसे खाल्ले आहेत का, पैसे खाल्ले म्हणून ते घाबरत आहेत का, असे प्रश्न मी खोतकरांना भेटल्यावर विचारणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी सांगितले.

 

Web Title : – Ramdas Kadam | why he is feeling so scared rebel shiv sena leader ramdas kadam question to jalna arjun khotkar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा