रामदास महाराज कैकाडी यांचे निधन

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन  –  वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त रामदास महाराज जाधव – कैकाडी यांचे आज सायंकाळी निधन झाले. ते ७७ वर्षे वयाचे होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी रामदास महाराज जाधव – कैकाडी यांना कोरोनाची लागण झाली होती. अकलूज येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. उपचार चालू असतानाच त्यांची तब्येत ढासळली आणि आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

रामदास महाराजांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली. वारकरी संप्रदायात त्यांना मानाचे स्थान होते. कैकाडी महाराजांचे ते पुतणे. पंढरपूरमधील सुप्रसिद्ध कैकाडी मठाचे व्यवस्थापन रामदास महाराजच पहात होते. पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे ते माजी सदस्य होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like