रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते : शरद पवार

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी ‘ या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी जाणता राजा शरद पवार असल्याचे पोस्टर झळकवले त्याबाबत आता खुद्द शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला ‘जाणता राजा’ म्हणा असं मी कुठेही, कोणालाही म्हटलेलं नाही. पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा कुणी नीट अभ्यास केला तर त्यांना हे ज्ञात होईल की छत्रपती यांची उपाधी ‘शिवछत्रपती’ ही होती, ‘जाणता राजा’ अशी कधीच नव्हती. खटाव – माण साखर कारखान्याच्या २५१००१ व्या साखर पोत्याचे पूजन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले , ‘जाणता राजा’ हे बिरुद रामदास स्वामींनी शिवरायांना दिलं आणि मी हेही सांगतो की, रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, तर त्यांच्या गुरु राजमाता जिजाऊ होत्या. शिवरायांचं व्यक्तिमत्त्व जिजाऊंनी घडवलं आहे,’ असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

मुंबईत राष्टवादीच्या कार्यकर्त्यांकडून झळकले पोस्टर
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी हे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर लिहिण्यात आले होते की, “आपापली राजकीय विचारसरणी निश्चित जोपासा, पण ज्या नेतृत्त्वामुळे महाराष्ट्र जगात ओळखला जातो त्या नेतृत्त्वावर अल्पमाहिती, अल्पज्ञानातून शिंतोडे उडवू नका. शरद पवार साहेब आम्हा तरुणांचे कालही जाणता राजा होते, आजही जाणता राजा आहेत. आणि भविष्यातही जाणता राजा राहणारच”.

उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत पोस्टर झळकल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. शिवाजी महाराजांसारखा एखादाच युगपुरुष जन्माला येतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो असे ते म्हणाले होते.

मात्र आता शरद पवारांनी उदयनराजेंना उत्तर दिले आहे. ‘मी कुठेच म्हणालो नाही की, मला जाणता राजा म्हणा असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे असं यावेळी ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/