Ramdev Baba | योगगुरू रामदेव बाबांनी लॉन्च केले Credit Card; काय आहेत फायदे? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ramdev Baba | योग आणि आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी पतंजली (Patanjali) योगपीठाची स्थापना केली. यानंतर आता पतंजलीने स्वतःचे क्रेडिट कार्ड (Credit Card) सुरू केले आहे. दरम्यान, हे क्रेडिट कार्ड पंजाब नॅशनल बँक Punjab National Bank (PNB) आणि रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने (Patanjali Ayurveda Limited) नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया National Payments Corporation Of India (NPCI) च्या भागीदारीत लॉन्च केलेय.

 

यानूसार, को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या RuPay प्लॅटफॉर्मवर ऑफर केलेय. हे पीएनबी रुपये प्लॅटिनम आणि पीएनबी रुपयेसिलेक्ट या 2 प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. तर, 2 को-ब्रँडेड कार्ड्स पतंजली उत्पादने खरेदी करण्यासाठी अडचण मुक्त क्रेडिट सेवा देतात आणि Cash Back, Loyalty Points, विमा संरक्षण तसेच अन्य काही सेवा आहेत. कार्ड लाँच झाल्यापासून 3 महिन्यांपर्यंत, कार्डधारकांना पतंजली स्टोअरमध्ये 50 रुपयांच्या प्रति व्यवहाराच्या मर्यादेच्या अधीन 2 हजार 500 रुपये वरील व्यवहारांसाठी 2 टक्के योग्य कॅशबॅक मिळवता येतो. त्याचबरोबर प्रति व्यवहार कॅशबॅकची मर्यादा 50 रुपये असणार आहे. (Ramdev Baba)

 

दरम्यान, पीएनबी (PNB) रुपये प्लेटिनम आणि पीएनबी रुपये सिलेक्ट कार्डधारकांना अ‍ॅक्टिव्हेशनवर 300 रिवॉर्ड पॉइंट्सचा वेलकम बोनस मिळणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ लाउंज एक्सेस, कार्ड व्यवस्थापनासाठी पीएनबी जिनी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, अ‍ॅड-ऑन कार्ड सुविधा, खर्चावर आकर्षक रिवॉर्ड पॉइंट्स, EMI आणि ऑटो-डेबिटची सुविधा मिळणार आहे.

प्लॅटिनम आणि सिलेक्ट कार्ड्स अ‍ॅक्सिडेंटल डेथ आमि पर्सनल टोटल डिसएबिलिटी साठी (Platinum And Select Cards Accidental Death And Personal Total Disability) दोन आणि दहा लाख रुपयांचे संरक्षण मिळणार आहे.
Platinum Credit Card वर 25 हजार रुपये ते पाच लाख रुपयांची क्रेडिट मर्यादा उपलब्ध असणार आहे.
त्याचबरोबर सिलेक्ट कार्डवर 50 हजार रुपये ते दहा लाख रुपयांची क्रेडिट मर्यादा उपलब्ध असणार आहे.
प्लॅटिनम कार्डवर झिरो जॉइनिंग फी असणार आहे. तर, यात पाचशे रुपये वार्षिक शुल्क असणार आहे.
तसेच. सिलेक्ट कार्डवर पाचशे रुपये जॉइनिंग शुल्क व 750 रुपये वार्षिक शुल्क असणार आहे.

 

 

Web Title :- Ramdev Baba | pnb launches co branded contactless credit cards with patanjali in partnership with rupay

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची खरमरीत टीका, म्हणाले – ‘पवारसाहेब आम्ही पीत नाही, तुम्हीच वाईन अन् दारूमधला फरक समजावून सांगा’

 

Satara Crime | दुर्दैवी ! बोलेरोची दुचाकीला समोरून धडक, बापलेकाचा मृत्यू

 

IND vs WI | 1000 वा एकदिवसीय सामना खेळणारा पहिला देश बनणार भारत, वेस्टइंडीज विरूद्ध अहमदाबादमध्ये ऐतिहासिक सामना