Ramesh Bais | महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस कोण आहेत? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari Resign) यांचा राजीनामा मंजूर (Resignation) करण्यात आला आहे आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याकडून राजीनाम्यावर अखेर मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस (Ramesh Bais) हे भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य असून तब्बल 7 वेळा ते खासदार (MP) म्हणून निवडून गेले होते. सध्या ते झारखंडचे राज्यपाल (Governor of Jharkhand) म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी 2019 मध्ये त्रिपुराचे (Tripura) 18 वे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे.

 

रमेश बैस यांचा (Ramesh Bais) २ ऑगस्ट १९४८ रोजी जन्म झाला आहे. ७४ वर्षाचे रमेश बैस हे वाणिज्य पदवीधर (Commerce Graduate) आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते सक्रीय सदस्य राहिले आहेत. त्यांनी अगदी सरपंचापासून आमदार (MLA) म्हणून काम केले आहे. ते १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते. ते रायपूरमधून १९८९, १९९६, १९९८, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. २०१९ मध्ये त्यांनी निवडून लढविली नव्हती. त्यानंतर त्यांची २९ जुलै २०१९ रोजी त्यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

रमेश बैस यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणून १३ जुलै २०२१ रोजी पदभार स्वीकारला होता.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांच्याशी त्यांचे कधीही जमले नाही.
महाराष्ट्रात ज्या प्रमाणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray)
आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात प्रत्येक बाबीवर वाद झडत होते.
त्याच प्रमाणे हेमंत सोरेन यांच्या प्रत्येक निर्णयाला रमेश बैस यांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केले.

 

Web Title :- Ramesh Bais | Who is the newly appointed Governor of Maharashtra Ramesh Bais? find out

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा