‘रामायण’ मालिकेत ‘सुषेण वैद्य’ साकारणारे रमेश चौरसिया उज्जैनमध्ये होते पान विक्रेते, हॉटेल आणि दुकानाचं नाव ‘संजीवनी’

पोलिसनामा ऑनलाइन –रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका रामायणमध्ये सुषेण वैद्याची भूमिका साकारणारे रमेश चौरसिया हे उज्जैनचे रहिवासी आहेत. रावणची भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदीचे ते मित्र होते. चौरसिया यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की, त्रिवेदी यांची मैत्री त्यांना मायानगरी मुंबईमध्ये घेऊन जाईल. लांब दाढी आणि प्रभावशाली मिशांमुळं त्यांची निवड सुषेण वैद्य म्हणून करण्यात आली.

शहरात अगदी सायकल फिरणारे रमेश चौरसिया सध्या तर या जगात नाही. परंतु त्यांच्या आठवणी मात्र आजही शहरवासियांच्या मनात ताज्या आहेत. मोठी गोष्ट ही आहे की, लोकप्रियता मिळूनही ते खूप सरळ राहिले.

https://twitter.com/30Kumaar/status/1251159333326340098

रमेश चौरसिया यांचं निधन झालं आहे. परंतु मुख्य बस स्टँड देवासगेट वर त्यांचं नमकीनचं दुकान आणि एक हॉटेलही आहे. या दुकान आणि हॉटेलचं नावही संजीवनी ठेवण्यात आलं आहे. दुकानात त्यांच्या सुषेण वैद्याच्या भूमिकेतील अनेक फोटो आहेत.

रामायण ही मालिका आजही खूप लोकप्रिय ठरली आहे. यातील प्रत्येक पात्र चाहत्यांना आवडत आहे. यातील अनेक पात्रांनी सोशलवर डेब्यू केला असून ते चाहत्यांच्या संपर्कात आहेत. यातील अनेकांचे न ऐकलेले किस्सेही समोर येताना दिसत आहेत.