रमेश शिंदे यांची राष्ट्रवादी कामगार सेलच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी निवड

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी इंदापूर(सावतामाळीनगर) येथील रमेश विठ्ठल शिंदे यांची निवड करण्यात आली असुन त्यांना या निवडीबाबतचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पूणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे हस्ते नुकतेच इंदापूर येथे देण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल प्रदीप गारटकर यांचे हस्ते रमेश शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

रमेश शिंदे यांची निवड ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार व राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुचनेनुसार व मार्गदर्शना नुसार करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्रात नमुद करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना रमेश शिंदे म्हणाले की मागील दहा वर्षापासुन मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ पूणे यांचे माध्यमातुन इंदापूर तालुक्यातील इमारत बांधकामगारांच्या समस्यां निवारणासाठी व त्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातुन लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील असुन इंदापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे केली असुन कामगारांना शासनाच्या वेगवेगळ्या २८ योजनांचे लाभाचे फाॅर्म भरण्याची सुविधा इंदापूर येथेच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे रमेश शिंदे यांनी सांगीतले.

यावेळी राष्ट्रवादीचे इंदापूर तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे-पाटील, नगरसेवक पोपट शिंदे, अतुल झगडे, खजाभाई बागवान,नाथा रूपनवर,विजय वाघमोडे, विजय शिंदे यांचेसह आनेक कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते.