Birthday SPL : ‘शोले’, ‘शक्ति’ सारख्या हिट सिनेमाच्या डायरेक्टरची ओळख 21 व्या शतकात ‘धूसर’ ! ‘हे’ सिनेमे आजही अविस्मरणीय

पोलिसनामा ऑनलाईन – 70 आणि 80 च्या दशकातील फेमस फिल्ममेकर रमेश सिप्पी (Ramesh Sippy) यांना आजची पिढी खूप कमी ओळखते. याचं कारण म्हणजे 21 व्या शतकात त्याचं सिनेमासोबत नातं चांगलं नसणं आहे. शोले, शक्ति, सीता और गीता असे हिंदी सिनेमे हिट सिनेमाच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यांच्या पहिल्या अंदाज या सिनेमातून त्यांनी स्वत:ला सिद्ध करायला सुरुवात केली होती. हिंदी सिनेमाला त्यांनी गब्बर आणि शाकाल सारखे विलन दिले. पद्मश्री विजेता या डायरेक्टरनं वयाच्या 6 व्या वर्षापासूनच सिनेमाच्या सेटवर जायला सुरुवात केली होती. त्यांचे वडिल गोपालदास परमानंद सिप्पी (जी पी सिप्पी) त्या काळात प्रसिद्ध निर्माते होते. त्यामुळं त्यांनी चित्रीकरणाची कला लहानपणीच शिकली. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या काही अविस्मरणीय सिनेमांवर आपण एक नजर टाकूयात.

1) अंदाज (1971) – 7 वर्षे एक सहायक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर जेव्हा रमेश यांना पूर्ण सिनेमा बनवण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी अंदाज सिनेमा तयार केला. ते नवीन असल्यानं कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. निर्मितीची धुरा त्यांच्या वडिलांनाच सांभाळावी लागली. या सिनेमानंतर शम्मी कपूर आणि हेमा मालिनी सारख्या स्टार्सवर प्रसिद्धी आणि संपत्तीचा वर्षाव झाला. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या नावावर सिनेमा विकला गेला. त्यांचं सिनेमात खूप कमी आहे. त्यांना या सिनेमाच्या निमित्तानं चांगली सुरुवात मिळाली.

2) सीता और गीता (1972) – रमेश यांचा पहिला सिनेमा हा सलीम-जावेद यांनी लिहिला होता. त्यांच्या दुसऱ्या सिनेमासाठीही या जोडीनं काम केलं. हेमा मालिनींचा डबल रोल असणारा हा सिनेमा लोकांच्या मनात भरला. सिनेमात धर्मेंद्र आणि संजीव कुमारही होते. या सिनेमानंतर बॉलिवूडमध्ये जुडवा बहिण भावांवर अनेक सिनेमे बनवण्यात आले.

3) शोले (1975) – सर्वश्रेष्ठ हिंदी सिनेमाचा दर्जा मिळवणारा शोले हा सिनेमा फक्त रमेश सिप्पी यांचाच नाही तर भारतीय सिनेमातील आतापर्यंतचा सर्वात सदाबहार सिनेमा आहे. रमेश यांच्या मते सिनेमाच्या यशाचं रहस्य पटकथा आणि पार्श्व संगीत आहे. 2005 साली 50 व्या फिल्मफेअर सोहळ्यात सिनेमाला गेल्या 50 वर्षातील सर्वश्रेष्ठ सिनेमाचा दर्जा देण्यात आला. सोबतच ब्रिटीश फिल्म इंस्टिट्युटनं 2002 च्या वोटींग मध्ये 10 भारतीय सिनेमांच्या यादीत शोलेला प्रथम स्थान दिलं.

4) शक्ति (1982) – 1982 साली आलेल्या या सिनेमामुळं रमेश सिप्पी यांनी यशाची आणखी एक शिडी चढली. दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांना एकत्र पडद्यावर आणण्याचं श्रेय देखील या सिनेमाला जातं. या सिनेमासाठी बेस्ट अॅक्टर म्हणून दिलीप कुमार आणि अमिताभ असं दोघांनाही नामांकन मिळालं होतं. परंतु दिलीप कुमार यांनी यात बाजी मारली. हा सिनेमा त्या वर्षातील बेस्ट सिनेमा ठरला आणि याला यासाठीच फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

5) सगर (1985) – दिवंगत अभिनेता ऋषी कपूर तेव्हा खूप नाराज होते जेव्हा बॉबी सिनेमात काम केल्यानंतर डिंपल कपाडिया यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या 12 वर्षांनंतर जेव्हा डिंपल यांना सिनेमात वापसी करायची होती तेव्हा रमेश यांनी ऋषी आणि डिंपल यांना सागर सिनेमात कास्ट केलं होतं. अभिनेता कमल हासन यांनीही सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. हा एक रोमँटीक ड्रामा सिनेमा होता ज्यासाठी कमल हासन यांना बेस्ट अॅक्टरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सिप्पी यांचा हा सिनेमा अखेरचा यशस्वी सिनेमा ठरला.