आयोध्या : रामललाची मूर्ती ‘अस्थायी’ मंदिरात हलविली, CM योगी आदित्यनाथ उपस्थित

अयोध्या : पोलीसनामा ऑनलाइन – आयोध्येत भव्या राम मंदिर निर्माण करण्याचा पहिला टप्पा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरु झाला आहे. रामललाची मूर्ती ‘अस्थायी’ मंदिरात हलविण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. त्यांनी समाज माध्यमांद्वारे ही माहिती दिली. योगी आदित्यनाथ यांनी त्यात म्हटले आहे की, भव्य राम मंदिर निर्माण करण्याचे पहिले चरण आज संपन्न झाले. मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम नवीन आसनावर विराजमान झाले. मानस भवनाजवळील अस्थायी मंदिरात रामलला यांना स्थानांतरीत केले आहे. भव्य मंदिराच्या निर्माणासाठी या वेळी 11 लाख रुपयांचा धनादेश भेट देण्यात आला आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज पहाटे ३ वाजता रामजन्मभूमि परिसरातील गर्भगृहामध्ये रामलला यांना स्नान आणि पुजा अर्चा केल्यानंतर तात्पुरत्या मंदिरात हलविण्यात आले. यावेळी रामजन्मभूमिचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास, ट्रस्टचे सदस्य राजा बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्र, सदस्य अनिल मिश्रा, ट्रस्टचे महासचिव चपंत राय, दिगंबर आखाड्याचे महंत सुरेश दास, अवनीस अवस्थी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ उपस्थित होते.