Ramnath Kovind | रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास शिवप्रेमींचा विरोध ! राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतला मोठा निर्णय

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) हे 7 डिसेंबर रोजी किल्ले रायगडाला भेट देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांना ते अभिवादन करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव हॅलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर (Raigad fort) उतरवले जाणार होते. मात्र यावरुन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रपतींचे हॅलिकॉप्टर रायगडावर उतरु देणार नसल्याचा पवित्रा शिवप्रेमींनी घेतला आहे. शिवप्रेमींच्या विरोधानंतर राष्ट्रपती (President) रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी मोठा निर्णय घेत रायगडावर जाण्याचा मार्ग बदलला आहे.

 

राष्ट्रपती रायगडावर येत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेच नातेगाव ते पाचड मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी (tourists) बंद करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जगासह देशाच्या विविध भागातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.

 

शिवप्रेमींचा विरोध पाहून राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टरने (helicopter) किल्ल्यावर न येता रोपवेने येण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे  (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती (Ramnath Kovind) महोदयांनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोपवेने (ropeway) येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस मी सल्यूट करतो, असे संभाजीराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

रायगड जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे पर्यटकांना आकर्षित करतात,
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याला नक्कीच भेट देतात.
यामुळे पर्यटकांची गैरसोय होवू नये म्हणूनच पोलिसांनी आधीच सूचना दिली आहे.
भाजपचे (BJP) राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींना काही दिवसापूर्वी रायगड भेटीचे आमंत्रण दिले होते.

 

Web Title :- Ramnath Kovind | president ramnath kovind will go raigad fort ropeway not helicopter chhatrapati sambhaji bhosale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

How To Become Crorepati | फक्त 15,000 रुपये महिना गुंतवणुकीतून बनू शकता करोडपती, जाणून घ्या काय आहे फार्म्युला

PM Kisan | खुशखबर ! 1 आठवड्यानंतर शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 4000 रुपये, राज्य सरकारांनी केली आहे तयारी, चेक करा स्टेटस

Vicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला विकी कौशल; एवढ्या रात्री येण्याचं कारण ?