NDTV चे  व्यवस्थापकीय संपादक ‘रविशकुमार’ यांना ‘रैमॉन मैगसेसे’ पुरस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र छबी निर्माण करणारे आणि सामान्यांच्या प्रश्नांवर लढाई लढणारे एनडीटीव्हीचे व्यवस्थापकीय संपादक रवीश कुमार यांचा रैमॉन मैगसेसे पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. पत्रकारितेतील क्षेत्रात रैमॉन मैगसेसे या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हटले जाते. यापूर्वी हा पुरस्कार अरुण शौरी यांना देण्यात आला आहे.

रैमॉन मैगसेसे पुरस्कार हा आशियातील व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान केला जातो. फिलिपिन्सचे माजी राष्ट्रपती रैमॉन मैगसेसे यांच्या स्मृतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येतो. त्याला आशियातील नोबेल असे संबोधले जाते.

एनडीव्हीटीचे व्यवस्थापकीय संपादक रवीशकुमार यांनी हिंदी टीव्ही पत्रकारितेत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अन्य टिव्ही चॅनेल हे राजकीय आरोपप्रत्यारोपात दिवसभर गुंतलेले असताना रवीश कुमार यांनी आपल्या चॅनेलवरुन रोजगार हा विषय लावून धरला होता. देशभरातील विविध राज्यातील सरकारी नोकरभरती कशी होत नाही. सरकारी जागांसाठी परिक्षाच घेतल्या जात नाही. परिक्षा घेतल्या तर त्यांचे निकाल वर्षानुवर्षे जाहीर करत नाही. निकाल जाहीर केला तर उर्त्तीण उमेदवारांना अपॉईमेंट लेटर दिले जात नाही. अशा रोजगाराशी संबंधित सर्व बाजूचा रिपोर्ट आपल्या कार्यक्रमातून दिवसेंदिवस ते मांडत आले. त्यातून अनेक राज्यातील सरकारी परिक्षा घेतल्या गेल्या. असंख्य जणांना अपॉईमेंट लेटर देणे केंद्र व राज्य शासनाला भाग पडले.

त्यांच्या या कार्यक्रमामुळे रोजगार या विषयावर देशभर चर्चा घडू लागली.  लोकसभा निवडणुकीच्या काळातही त्यांनी नेत्यांची भाषणबाजी ऐकविण्याऐवजी प्रत्यक्ष लोकांशी संपर्क साधून त्यांचे प्रश्न समोर आणण्याचा प्रयत्न केला. अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामुळे २०१९ च्या रैमॉन मैगसेसे पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –