हार्दिक पंड्यासोबत रॅम्प वॉक करणारी ‘ती’ मॉडेल कोण ? (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वेस्ट इंडिज दाैऱ्यातील तीनही संघात हार्दिक पंड्याचा समावेश केलेला नाही. कारण सध्या तो दुखापतीतून सावरत आहे. असे असले तरी मोकळ्या वेळेत तो ‘बेबी सिटींग’ आणि रॅम्प वॉकची संधी अजिबातच सोडत नाही असे दिसत आहे. नुकताच त्याचा बेबी सिटींगचा व्हिडीओ समोर आला होता जो खूप व्हायरल झाला होता.

View this post on Instagram

New experience but a fun one 😁

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

चार दिवसांपूर्वी हार्दिकचा बेबी सिटिंगचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात हार्दिकसोबत स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील अँकर जतीन सप्रू यांची मुलगी दिसली होती. तो दिवसभर तिच्यासोबत खेळत होता. त्याने व्हिडीओ शेअर करताना “Babysitting Sunday” असं कॅप्शनही दिलं होतं.

नुकतेच काही फोटो समोर आले आहेत ज्यात त्याने रॅम्प वॉक केल्याचे दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत भाऊ कृणाल पंड्याही होता. परंतु सध्या एका अभिनेत्रीची खूपच चर्चा होताना दिसत आहे जी हार्दिक सोबत होती. विशेष बाब अशी की, करीना कपूर, करिष्मा तसेच कॅटरीना कैफ असताना या अभिनेत्री सोबतच्या हार्दिकच्या रॅम्प वॉकची चर्चा होताना दिसत आहे. लिसा हेडन असे तिचे नाव आहे. सध्या हार्दिक आणि लिसाचे अनेक फोटो सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

Hardik-and-Krunal

Hardik-and-Lisa

आरोग्यविषयक वृत्त –

 

 

You might also like