काय सांगता ! होय, 20 वर्षाच्या तरूणानं केलं 60 वर्षाच्या महिलेशी लग्न, असं जुळलं त्यांचं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रेमाला वय नसते असे म्हणतात. हेच सत्यात उतरलं आहे. चक्क 20 वर्षाच्या तरुणाने 60 वर्षाच्या महिलेशी विवाह केल्याने या जोडप्याची चर्चा सध्या रंगली आहे. तुम्हालाही धक्का बसेल, पण हे खरे आहे. उत्तर प्रदेशच्या रामपूरमधील ही घटना आहे. एकमेकांशी फोनवर बोलता बोलता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पहिल्यांदा ते एकमेकांशी फोनवर बोलू लागले आणि त्यानंतर ते एकमेकांशी व्हिडिओ कॉलवर बोलू लागले. त्यानंतर आता त्यांच्या प्रेमाचे विवाहात रुपांतर झाले आणि साताजन्माच्या गाठी बांधल्या गेल्या.

दोन वर्षांपूर्वी जतपूरा गावात राहणाऱ्या 60 वर्षीय केसरवती यांना हरडोई या गावातील 20 वर्षीय राकेश पाल या तरुणाचा मोबाइल नंबर मिळाला. त्यानंतर केसरवती आणि राकेश यांच्यात फोनवर संभाषण सुरु झाले. त्यानंतर ते एकमेंकांशी चॅटिंग करु लागले. नेहमीच्या संपर्काने त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

यानंतर राकेशने पहिल्यांदा केसरवती यांच्याकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि लग्नासाठी विचारले. त्यानंतर या दोघांनी जीवनसाथी होण्याचा निर्णय घेतला. शनिवारी राकेश त्याची प्रियसी केसरवती राहत असलेल्या रामपूरच्या जातपूरा या गावात पोहचला. तेथे या दोघांनी विवाह केला आणि विवाह बंधनात अडकले. या अनोख्या लग्नाची चर्चा आता रामपूरामध्ये रंगली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like