खा. आजम खानांच्या भोवतीचा ‘फास’ आवळला, पोलिसांकडून चौकशीसाठी मुलगा ‘ताब्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  रामपूरचे समाजवादी पार्टीचे खासदार आजम खान यांच्या जौहर यूनिवर्सिटीवर प्रशासनावे पुन्हा एकदा छापा मारला आहे. याशिवाय आता त्यांच्या मुलगा आमदार अब्दुल्लाह आजम खान यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. त्यांना पासपोर्टमध्ये खोटी माहिती दिल्यामुळे चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

याच आठवड्यात मंगळवारी प्रशासनाने यूनिवर्सिटीवर छापा मारला होता. या दरम्यान मदरसा आलियातून चोरण्यात आलेली पुस्तके जौहर अली यूनिवर्सिटीच्या लायब्ररीमधून ताब्यात घेतली आहेत. 
 
मंगळवारी रामपूरच्या भू माफिया घोषित आजम खान द्वारे स्थापित मोहम्मद अली जौहर विश्वविद्यालयवर छापा मारुन पोलिसांना मदरसा आलिया मधून चोरीला गेलेली पुस्तके ताब्यात घेतली आहे.  आजम या विश्वविद्यालयाचे प्रमुख ट्रस्टी आहेत.
पोलिसांची एक टीम १० गाड्यामध्ये मौलाना जौहर पोहचले आणि सेंट्रल लायब्ररीचा तपास सुरु केला. येथून पोलिसांनी काही पुस्तके ताब्यात घेतली. कर्मचाऱ्यांचा विरोध केला त्यांना ताब्यात घेण्यात आले. आरोप लावण्यात आला आहे की मदरसा आलियाच्या लायब्ररीमधून पुस्तके चोरी करण्यात आली आहे. 
 
याशिवाय, रामपूर जिल्हा प्रशासनाने खासदार आजम खान यांच्या हमसफर रिसॉर्टवर बुलडोजर चालवण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे, ज्यात सांगण्यात आली आहे, त्यांनी सिंचन विभागाच्या एक हजार यार्डवर अवैधपणे ताब्यात घेतले आहे.

जिल्हा प्रशासन आजम खान यांच्या भोवती फास आवळण्यात येत आहेत. पाच दिवसांआधी त्यांच्याच जौहर यूनिवर्सिटीचे गेट तोडण्याचे आदेश देण्यात आले होते. आता आजम यांच्या हमसफर रिसॉर्ट देखील प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला आहे. जिल्हाधिकारी आन्जनेय कुमार सिंह यांनी सांगितले की त्यांनी हमसफर रिसॉर्टमध्ये एक हजार यार्ड जमीन ताब्यात घेण्यात आला आहे. आजम खानवर पहिल्यांदाच अजीमनगर ठाण्यात जमीन ताब्यात घेण्यावरुन २७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय