‘त्या’ डॉक्टरचा मृतदेह संशयास्पदरित्या घरात आढळला, प्रचंड खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन – पंधरा दिवसापूर्वी उत्तर प्रदेशातील एका जिल्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि एका नर्समध्ये वाद झाला होता. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात आधी नर्स त्याला मारते आणि नंतर डॉक्टर तिला मारतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चौकशी करून डॉक्टरला बडतर्फ केले होते. पण नंतर पुन्हा त्यांना सेवेत घेतले होतेे. त्याच डॉक्टराचा मृतदेह रामपूरमध्ये त्यांच्या सरकारी घरात संशयास्पद रित्या आढळून आला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बी. एम. नागर असे मृत डॉक्टराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच डॉ. नागर यांनी पोलीस अधिक्षक शुगन गौतम यांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. आता त्यांचा संशयास्पद मृत्यू खळबळ उडाली आहे. तर आरोग्य अधिका-यांचे म्हणणे आहे की हा नैसर्गिक मृत्यू आहे. त्यांना बीपी-शुगरचा त्रास होता. एसपी डॉ. संसार सिंह म्हणाले की, त्यांच्या कुटुंबियांनी सांगितल्या नुसार, त्यांना शुगर आणि हार्टची समस्या होती. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. त्यांच्या परिवाराने लिहून दिले आहे की हा नैसर्गिक मृत्यू असून कोणत्याही पोलीस कारवाईची गरज नाही, असे म्हटल्याचे सिंह यांनी सांगितले.