दिलीप कुमारांची सासू नसीम बानो आणि ‘ही’ अभिनेत्री वाढवत होत्या रामपुरच्या नवाबाच्या महफिलीची ‘शान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवाब रजा अली खां गीत आणि संगीताचे शौकीन होते. त्यांच्या काळात कोठी खासबागमध्ये रात्री उशीरापर्यंत संगीताच्या मैफीली चालत असत. यात रामपूरच नाही देशभरातील मोठ्या लोकांचा समावेश असायचा. दिलीप कुमार यांची सासू आपल्या काळातील पहिली सुपरस्टार आणि ब्युटी क्वीन होती. त्यांनी जवळपास दोन वर्ष रामपूरमध्ये वास्तव्य करत नवाबच्या मैफीलीची शान वाढवली होती. अभिनेत्री निम्मी आणि गायिका अख्तरी बाईदेखील नवाबच्या मैफीलीत सहभागी होत असत.

कलाकारांची केली जायची कदर
नवाबी काळात रामपूर आणि कलाकारांची मोठी कदर केली जायची. आनंदाच्या क्षणी नवाबाकडून मोठ – मोठ्या मैफीलींचं आयोजन केलं जायचं. यात देशभरातील प्रसिद्ध सेलेब्रिटी सहभाग नोंदवत असत. कोठी खासबागमध्ये एक संगीत हॉलही होता. जेव्हा नवाबाचा मूड व्हायचा तेव्हा तेव्हा मैफील सजत असे. त्याच्या काळात रामपूर घराण्यातील संगीताला मजबूती मिळाली. देशभरातील अदाकारा रामपूरमध्ये येत असत. आपल्या काळातील पहिली महिला सुपरस्टार बनली ती म्हणजे नसीम बानो. नसीम खूपच सुंदर होत्या. त्या जवळपास दोन वर्ष रामपूरमध्ये राहिल्या. त्या मैफीलीत डान्स करत असत परंतु फक्त त्याच मैफीलीत ज्यामध्ये नवाब रजा अली खां आणि त्याच्या कुटुंबातील लोक असायचे. त्यांच्या राहण्याची खास सोय करण्यात आली होती. अभिनेत्री निम्मी याही अनेकदा रामपूरला आल्या आणि त्यांनी नवाबच्या मैफीलीची शान वाढवली आहे. निम्मीनंही डान्सनं नवाबचं मन जिंकलं होतं. याच काळात गायिका अख्तर बाईनंही गाणं ऐकवून आपल्या आवाजाचा जलवा दाखवला आहे.

नवाब स्वत: गाणी लिहित असे
नवाब रजा अली खां स्वत: गाणी लिहित असे. त्याला होळीची त्याला विशेष आवड होती. त्यानं होळीवर अनेक गाणी लिहीली आहेत. ब्रज भाषेत लिहिलेल्या या गाण्यात हिंदी, उर्दू, फारसी शब्दांचा वापर केलेला होता. रामपूर रजा लायब्ररीतील संगीत सागरमध्येही त्याच्या होळीच्या गाण्यांचा उल्लेख आहे. तो सर्वच धर्माच्या उत्सवात सहभाग घेत असते.