खा. आजम खान यांच्या ‘जौहर’ विद्यापीठावर छापा, १७७४ साली चोरीला गेलेली ‘प्राचीन’ पुस्तके जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशच्या रामपूरमधील जौहर विद्यापीठाच्या प्रशासनावर धाड टाकण्यात आली आहे. या छाप्यात पोलिसांनी जवळपास ३०० पुस्तके जप्त केली आहेत. पोलिसांनी सांगितले की, या पुस्तकांची चोरी झाली होती. हीच चोरी झालेली पुस्तक या जौहर विद्यापीठातून ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीस अजय पाल शर्मा यांच्या मते १७७४ साली स्थापित रामपूर मदरसा आलियामधून प्राचीन पुस्तके चोरी झाली होती. जी जौहार विद्यापीठाच्या लायब्ररीतून जप्त करण्यात आली आहेत. ही पुस्तके तब्बल १०० ते १५० वर्ष पूर्वीची आहेत.

४ जण ताब्यात –

जौहर यूनिवर्सिटी समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेता आणि खासदार आजम खान यांची आहे. सध्या विद्यापीठाच्या बाहेर मोठ्या संख्येने पोलीस तैनात आहे. प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी विद्यापीठातच आहेत त्यांची तपासणी सुरु आहे. जौहर विद्यापीठामध्ये मुमताज सेंट्रल लायब्ररीमध्ये सीओ पोलीस अधिकाऱ्याबरोबर पोलीस अधिकारी तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले आहे.

या आधी जौहर विद्यापीठाच्या विरोधात प्रशासनाने अनेक गुन्हा दाखल केले आहेत आणि कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने आजम खान यांना क्षतिपूर्तीच्या स्वरुपात ३ कोटी २७ लाख ६० हजार देण्यास सांगितले आहे. आजम खान यांचा ताब्यात मुक्त होईपर्यंत ९,१०,००० प्रति महा लोक निर्माण विभागाला देण्याचे आदेश दिले आहेत.

हसन यांना लुक आऊट नोटीस जारी –

२५ जुलैला न्यायालयाने जौहर यूनिवर्सिटीचा ७ हेक्टर जमिनीचा पट्टा रद्द करण्यात आला होता. ही जमीन २०१३ मध्ये ३० वर्षांसाठी मौलाना मोहम्मद अली जौहर ट्रस्टचे संयुक्त सचिव नसीर अहमद यांंच्या नावे भाड्याने देण्यात आली होती.

यात उत्तर प्रदेश पोलिसांनी जौहर यूनिवर्सिटीचे पदाधिकारी अली हसनच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ते आजम खान यांचे जवळचे सहकारी आहेत. ताबा घेणे आणि जबरदस्ती वसुली करण्याच्या २७ प्रकरणात आरोपी हसन यांच्या विरोधात एलओसी जारी करण्यात आली आहे.
यूपी पोलिसातून रिटायर झाल्यानंतर हसन सध्या सुरक्षा प्रभारी आहेत आणि आजम खान यांच्या मोहम्मद अली जौहर युनिवर्सिटीमध्ये आहेत. रामपूरचे एसपींनी, मोहमद अली जौहर यूनिवर्सिटीचे प्रशासन अधिकारी आणि प्रबंधक यांना नोटिस पाठवून जमिनीची कागदपत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे, ज्यासाठी विद्यापीठाने आणि कुलगुरु यांची शेतकऱ्याकडून खरेदी केल्याचा दावा केला आहे. शेतकऱ्याने आता त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त