आत्ताचे ‘छत्रपती’ स्वयंघोषीत ; रामराजेंची उदयनराजेंवर टीका

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – बारामतीच्या पाणी प्रश्नावर शरद पवार यांना घरचा आहेर देणाऱ्या उदयनराजे भोसले यांच्यावर रामराजे निंबाळकर यांनी टिका केली आहे. सगळी संस्थाने खालसा झाली असताना कुणी छत्रपती लावत का? असा प्रश्न विचारत त्यांनी आत्ताचे छत्रपती हे स्वयंघोषीत असल्याची टीका केली आहे. लोक छत्रपती म्हणतात म्हणून आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो. ते छत्रपतींचे वंशज आहेत त्यांनी छत्रपतीसारखे वागावे असे रामराजे यांनी म्हटले आहे.

उदयनराजे यांनी छत्रपतीसारखे वागेवे असे म्हणत सुर्य़ाजी पिसाळासारखे वागू नका असा सल्ला देखील त्यांनी उदयनराजेंना दिला. उदयनराजेंवर निषाणा साधताना रामराजे म्हणाले, तुमच्यावर खंडणी, खूनाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे खरे की खोटे हे न्यायालय ठरवत असते तुम्ही ठरवू शकत नाहीत. न्यायालयाचे निर्णय आपल्याला मान्य नसतील कारण शेवटी आपण तेरावे वंशज आहात. हे राज्य आपले गुलाम असेल मात्र फलटण कोणाच्या गुलामी खाली नाही.

 

जयकुमार गोरे यांनी ‘नाईक निंबाळकर दाखवा १०१ रुपये मिळवा’ असे म्हणाले होते. गोरे यांचा समाचार घेताना रामराजे म्हणाले, मी फलटणच्या जुन्या घरी असतो, गोरेंनी घरी येऊन बघावे. मात्र मला त्यांचे तोंड बघण्याची इच्छा नसल्याचे ते म्हणाले.

सिनेजगत

सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘प्रेमभंग’, बॉयफ्रेंडने केलं ‘ब्रेकअप’

पूनम पांडे म्हणते, माझे फोटो-व्हिडीओ म्हणजे ‘समाजसेवा’

‘रॅपर’ हनी सिंगचे ‘हे’ गाणे धुमाकूळ घालणार

ब्रेकअपनंतर अशी झाली होती शाहिद कपूरची ‘हालत’