Ramraje Naik Nimbalkar | गोरें हे काय देशातील पक्षाचे मालक झालेत का? आ. रामराजेंचा आ. गोरेंना टोला

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी आ.जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे. आ. गोरें हे काय देशातील पक्षाचे मालक झालेत का? का तुम्ही पक्षाचे वॉचमन आहात?, असा सवालदेखील आ. रामराजे (Ramraje Naik Nimbalkar) यांनी केला आहे.

 

काय म्हणाले आ. रामराजे निंबाळकर
सध्या पोलिस आणि महसूलची भीती दाखवून लुबडायचं काम चालू आहे. माण तालुक्यातून त्यांना उत्तर द्या, प्रत्येक वेळी फलटणवरून (Phaltan) मला बोलावं लागते. याची दखल अजितदादा (Ajit Pawar) तुम्ही घ्या, मी आहेच, मी कुणाला घाबरत नाही. हे एक आमदार व आमचा निर्बुद्ध खासदार यांना भविष्यात रोखलं नाही तर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे मोठे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. संवाद यात्रेत मोदींचा वाढदिवस म्हणून साजरा करताना जनतेला चांगला मेसेज देण्याऐवजी ठोकून काढूची भाषा एका राष्ट्रीय पक्षाला कशी चालते हाच मोठा प्रश्न आहे. म्हणे रामराजे भाजपमध्ये येणार होते. पण आम्हीच अडवलंय, हे काय देशातील पक्षाचे मालक झालेत का? का तुम्ही पक्षाचे वॉचमन आहात?, असा सवाल विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी भरसभेत आ. गोरेंना विचारला आहे. मार्डी, ता. माण येथील शेतकरी मेळाव्याप्रसंगी रामराजे निंबाळकर बोलत होते.

 

रामराजे निंबाळकर यांचे आवाहन
या सभेत आ. रामराजे नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, मला काळे झेंडे दाखवा नाहीतर अजून काही दाखवा, तुम्हाला पाणी मिळत नाही तो पर्यंत मी गप्प बसणार नाही. मी काळ्या झेंड्याना भीत नाही.कॉरिडॉर जिल्ह्याची आहे. ती कॉरिडॉर मी पळवली नाही. दुष्काळी भागात कॉरीडॉर (Corridor) झाली पाहिजे हा माझा आग्रह आहे. सदाशिवराव पोळ (Sadashivarao Pol) तात्यांच्या काळात गटातटाचे राजकारण कधीच झाले नाही. त्यामुळे सर्वांनी तात्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपापसातील हेवे दावे संपवून टाका, तुम्हांला कोणीही रोखू शकत नाही, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले आहे.

म्हसवड एमआयडीसीला माझा विरोध नाही…
केंद्र सरकारने एमआयडीसी मंजूर करताना म्हसवडची अधिसूचना काढली होती.
त्यावेळीदेखील मी विरोध केला नव्हता.
व आताही माझा म्हसवड एमआयडीसीला (Mhaswad MIDC) विरोध नाही,
असे स्पष्ट मत आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान उत्तर कोरेगाव हा दुष्काळी भाग असून तेथील शेतीला उद्योग, नोकरी, व्यवसायाची जोड मिळाली तर लोक चांगल्या प्रकारे जीवन व्यथित करु शकतात,
ही माझी सुचना होती. हेच काम मी फलटणमध्ये केले असल्याचे रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.

 

यावेळी प्रदिप विधाते, संदीप मांडले, बाळासाहेब सोळसरकर, सुभाषराव शिंदे, मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे,
नंदकुमार मोरे, नितीन भरगुडे-पाटील, अभय जगताप, मनिषा काळे, प्रा.कविता म्हेत्रे, सागर पोळ, महेश जाधव,
दिलीप तुपे, किशोर सोनवणे आदी नेते त्या ठिकाणी उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाची प्रास्तविक सोनाली पोळ यांनी केली तर अभय पोळ यांनी आभार मानले.

 

Web Title :- Ramraje Naik Nimbalkar | Do whites own the party in this country? come Ramraj’s A. Tola to the whites

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lumpy Skin Disease | ‘मोदींनी नायजेरियातून आलेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला’ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा अजिब आणि हास्यास्पद दावा

Udayanraje Bhosale | रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा : उदयनराजे भोसले

MNS On Shivsena | मनसेची शिवसेनेवर टीका, शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे… मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर