Ramshej Marathi Movie | फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि वीर मुरारबाजी चित्रपटाच्या निर्मात्यांकडून शिवरायांच्या जीवनावर आधारित नवीन चित्रपटाची घोषणा

पोलीसनामा ऑनलाइन – Ramshej Marathi Movie | छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जाज्वल इतिहास आणि शौर्याची गाथा मांडणारे अनेक चित्रपट मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या प्रदर्शित होत आहे. शिवरायांच्या आयुष्यातील लढाया, त्याची युद्धनिती आणि गनिमी कावा चित्रपट स्वरूपात मांडण्यात येत आहे. मराठीतील फर्जंद (Farzand), फत्तेशिकस्त (Fateshikast), पावनखिंड (Pawankhind) आणि शेर शिवराज (Sher Shivraj) या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. शिवरायांवर आधारित ही गाणी आजही तरुणांच्या तोंडात असतात. आता लवकरच छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील आणखी एका घटनेवर आधारित चित्रपट निर्मित केला जाणार आहे. (Ramshej Marathi Movie)

छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिनेता अंकित मोहन (Actor Ankit Mohan) याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ‘रामशेज’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याने शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर रामशेज चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज केला आहे. या इन्स्टाग्राम पोस्टला त्याने कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, “जय श्री राम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळा दिनाचे औचित्य साधून महाराजांच्या चरणी अर्पण करत आहोत आलमंड्स क्रिएशन्सची भव्यदिव्य अशी आगामी कलाकृती ‘रामशेज’…”

अभिनेता अंकित मोहनच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी अशा कमेंटस् केल्या आहेत. अभिनेता अंकित मोहन प्रमुख भूमिका साकारणार असून हरीश दुधाडे (Harish Dudhade), प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. लवकरच चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल अशी माहिती अंकित मोहनने पोस्ट शेअर करीत दिली आहे.

रामशेज हा किल्ला असून तो नाशिकपासून (Nashik) १६ किलोमीटरच्या अंतरावर आहे. मराठ्यांनी साडेसहा वर्षं मुघलांविरुद्ध हा किल्ला लढवला होता. प्रभू श्रीराम (Prabhu Shri Ram) श्रीलंकेला जात असताना त्यांचे या किल्ल्यावर वास्तव्य असल्याने या किल्ल्याचे नाव ‘रामशेज’ असे ठेवण्यात आले अशी आख्यायिका आहे. या आख्यायिकेप्रमाणे, चित्रपटाच्या पोस्टरमध्येही शिवाजी महाराजांचा मावळा आणि त्यामागे प्रभू श्रीरामांची छाया दाखवण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये ‘रामशेज’ चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. (Ramshej Marathi Movie)

छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) आधारित अनेक चित्रपटांमध्ये
अभिनेता अंकित मोहनने काम केले आहे. ऐतिहासिक चित्रपटातील त्याच्या उत्तम अभिनयामुळे
महाराष्ट्रातील घराघरात तो पोहचला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक
दिनानिमित्त अंकितने हातावर ‘राजे’ असा टॅटू गोंदवत महाराजांना अनोखी मानवंदना वाहिली आहे.

Web Title :  Ramshej Marathi Movie | announcement of new marathi historical movie ramshej shooting will start soon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Bypoll Election | ‘…तर मी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार’, मनसे नेते वसंत मोरेंचं मोठं विधान

Palkhi Sohala 2023 – Pune Traffic Updates | श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी 17 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात