रामटेकमधून शिवसेनेच्या ‘कृपाल तुमाने’ यांनी पुन्हा मारली बाजी

रामटेक : पोलीसनामा ऑनलाईन – रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांनी पुन्हा एकदा विजयाची पताका फडकावली आहे. कृपाल तुमाने यांनी ९२,४२२ मतांनी विजय मिळवला आहे. रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने, काँग्रेसचे किशोर गजभिये, बहुजन समाज पक्षाचे सुभाष गजभिये मैदानात होते तर वंचित बहुजन आघाडीकडून किरण रोडगे रिंगणात होते. येथे शिवसेनेच्या कृपाल तुमाने विरुद्ध काँग्रेसचे किशोर गजबिये यांच्यात मुख्य लढत होती.

शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांना ४,८३,७८५ मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार किशोर गजबिये यांना ३,९१,३६३ मते मिळाली तसेच बहुजन समाज पक्षाच्या सुभाष गजभिये यांना ३७,१३९ मते मिळाली. रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार १९ लाख २१ हजार ०७४ मतदार आहेत.  त्यापैकी एकूण ११ लाख ९३ हजार ३०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदार संघात ६२.१२ % टक्के मतदान झाले.

रामटेक या मतदारसंघामध्ये सध्या नागपूर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला होता. गेल्यावेळेस कृपाल तुमाने यांनी काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांचा तब्बल १,७५,७९१ मतांनी पराभव करत काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. त्यामुळे यावेळेस कृपाल तुमाने यांनाच युतीकडुन उमेदवारी देण्यात आली. कृपाल तुमाने यांनी पुन्हा निवडून येत त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला आहे.

२००९ मध्ये निवडून आल्यानंतर २०१४ मध्ये पराभूत झालेले मुकुल वासनिक यंदाही रामटेकमधून लढण्यास इच्छुक होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही तसा जोर लावला होता. पण काँग्रेसमधल्या इतर गटांचा विरोध पाहून स्वतः वासनिकांनीच आपली तलवार म्यान केली होती.

रामटेक मतदार संघ
एकूण मतदार – १७ , १७ , ८३०

एकूण मतदान – ६५.१५ %

विजयी उमेदवार – कृपाल तुमाने

मिळालेली मते – ४,८३,७८५