तब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर दोघे एकत्र पडद्यावर दिसणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन पडद्यावर नेहमीच झळकत असतो. त्याचे चाहते त्याला वेगवेगळ्या भूमीकेत पाहत असतात. त्याचबरोबर बाहूबली चित्रपटातील मुख्य शिवगामीच्या भूमिकेतील अभिनेत्री राम्या कृष्णन ही देशभर प्रसिद्ध झाली. हे दोघे ही काही वर्षाआधी ‘बडे मिया छोटे मिया’ मध्ये एकत्र दिसले होते. हे दोघे ही तब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकत्र पडद्यावर दिसणार आहे. ‘उयन्थ्रा मानिथन’ या तमिळ चित्रपटात हे दोघे मुख्य भूमिकेत त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री राम्या कृष्णन ही तमिळ सिनेमातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. जसे अमिताभ बच्चन चे लाखो चाहते आहे. तसे तिचे ही चाहते तसे कमी नाहीत. देशभरात बाहूबली मध्ये शिवगामीच्या भूमिकेमधून अनेकांच्या मनात घर करणाऱ्या या अभिनेत्रीला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार देखिल मिळाले आहे. अमिताभ बच्चन आणि आणि राम्या कृष्णन हे खुप वर्षानंतर एकत्र दिसणार आहे. या दोघांची केमिस्ट्री काय आहे ? याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आहे. अमिताभची भूमिका काय आहे ? हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे.

अभिनेता अमिताभ बच्चन यांचा पहिला ‘उयन्थ्रा मानिथन’ हा तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटातील त्याच्या लुकचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. हा चित्रपट तमिळ सोबतच हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.