Birthday SPL : एका दिवसात 40 अंडी, 8 तास Gym ! ‘अशा’ प्रकारे राणा डग्गुबाती बनला ‘बाहुबली’मधील ‘भल्लालदेव’

पोलीसनामा ऑनलाइन –  भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात मोठा सिनेमा बाहुबली (Baahubali) मध्ये भल्लालदेव ही भूमिका साकारणाऱ्या राणा डग्गुबाती (Rana Daggubati) आज (सोमवार दि 14 डिसेंबर 2020) आपला वाढदिवस साजरा करत आहे. राणानं अनेक सिनेमात काम करूनही त्याला लोक भल्लादेव म्हणूनच जास्त ओळखायला लागले आहेत. आज आपण काही खास माहिती जाणून घेणार आहोत जी क्वचितच प्रेक्षकांना माहित असेल.

कसा तयार झाला भल्लालदेवचा रोल ?

भल्लालदेव बनण्यासाठी राणानं खूप मेहनत घेतली होती. फिजीकली त्याला स्वत:ला खूप चॅलेंज करावं लागलं होतं. असं सांगितलं जात आहे की, यासाठी राणाला रोज 4000 कॅलरीज घ्याव्या लागत होत्या. एवढ्या मोठ्या इंटेक साठी त्याला रोज 40 अंडी खावी लागत होती. याशिवाय तो रोज जीममध्ये 8 तास घाम गाळत होता. एका सामान्य माणूस दिवसातून 3 वेळा जेवतो. परंतु भल्लालदेव बनण्यासाठी राणाला एकाच दिवसात 8 वेळा जेवण करावं लागत होतं. तो प्रत्येक 2 तासाला भातही खात होता.

https://www.instagram.com/p/CIqDju1j5GV/?utm_source=ig_embed

अभिनेत्यानुसार, या रोलसाठी त्यानं त्याचं वजन 100 किलोपर्यंत केलं होतं. आता एवढं वजन असल्यावर कोणाचंही पोट दिसू लागेल. परंतु त्यानं एवढी मेहनत घेतली होती की, त्यानं सर्व वजन मसल्सच्या रुपात वाढवलं होतं. अशात सर्वांना भल्लालदेवची शानदार बॉडी पहायला मिळाली.

राणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच तो हाथी मेरे साथी या सिनेमात काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. आता 2021 मधील मकर संक्रांतीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. यात पुलकित सम्राट, श्रिया पिळगावकर, जोया हुसैन यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अनेक भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.