भाजपच्या राणाजगजितसिंह यांनी उधळला विजयाचा गुलाल, मधुकर चव्हाण यांना जनतेने नाकारले

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – तुळजापूर मतदारसंघात भाजपचे राणाजगजित सिंह पाटील आणि काँग्रेसचे मधुकर चव्हाण यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली. राणाजगजितसिंह हे मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. त्यांना आघाडी कायम राखली आणि दमदार विजय मिळवला. राणाजगजितसिंह यांनी 23,159 मतांनी मधुकर चव्हाण यांचा पराभव केला. राणाजगजितसिंह आणि मधुकर चव्हाण यांच्यात 23 हजार मतांचा फरक होता.

दुपारी 4.30 च्या दरम्यान राणाजगजितसिंह हे 98,053 मतांनी आघाडीवर होते तर मधुकर चव्हाण 75,271 मतांवर होते. त्यामुळे पुन्हा एकदा आमदार होण्याचा कौल मधुकर चव्हाण यांना नाकरल्याचे दिसले. या मतदारसंघात 64.46 टक्के मतदान झाले होते.

राज्यात झालेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांनी 70,701 एवढी मते घेत विजय मिळवला. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जीवनराव गोरे होते. त्यांना 41,091 मते मिळाली. आणि त्यांचा 29,610 मतांनी पराभव झाला. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर भाजपचे संजय निंबाळकर, चौथ्या स्थानावर मनसेचे देवानंद रोचकरी आणि पाचव्या क्रमांकावर शिवसेना चे सुधीर पाटील होते.

 

1. राणाजगजितसिंह पद्‍मसिंह पाटील (भाजप) – 99034 मते (विजयी उमेदवार)
2. चव्हाण मधुकरराव देवराव (राष्ट्रवादी) – 75865 मते
3. अ‍ॅड. यावलकर शैलेंद्र रामेश्वरअप्पा (बहुजन समाज पार्टी) – 924 मते
4. नवगिरे प्रशांत प्रकाश (मनसे) – 1431 मते
5. अनिल नेताजी जाधवर (अखिल भारतीय एकता पार्टी) – 939 मते
6. अशोक हरीदास जगदाळे (वंचित बहुजन आघाडी) – 35383 मते
7. तात्या पंढरीनाथ रोडे (बळीराजा पार्टी) – 569 मते
8. तौफीक अब्बास पटेल (टीपू सुल्तान पार्टी) – 584 मते
9. महेंद्र (काका) धुरगुडे (प्रहर जनशक्ती पक्ष) – 7458 मते
10. अतिश अशोक रसाळ (अपक्ष) – 344 मते
11. तनवीर अली सय्यद अली खतीब (अपक्ष) – 1000 मते
12. दत्ता सुदाम कांबळे (अपक्ष) – 432 मते
13. नवनाथ दशरथ उपळेकर (अपक्ष) – 435 मते
14. पांडुरंग ज्ञानोबा शिंदे (अपक्ष) – 228 मते
15. मधुकर देवराव चव्हाण (अपक्ष) – 366 मते
16. महानंदा राजेंद्र दुधभाते (अपक्ष) – 1460 मते
17. विशाल भाऊसाहेब जानराव (अपक्ष) -1031 मते
18. शेख बाबा फैजोद्दीन (अपक्ष) – 205 मते
19. NOTA – 960 मते

Visit : Policenama.com