सुई -धागा चित्रपटामध्ये रणबीर आणि अनुष्का शर्मा दिसणार एकत्र

मुंबई : पोलीसनामा  ऑनलाईन 
सिनेमासृष्टी  गाजवलेला अभिनेता वरुण धवन आणि  अनेक उत्कृष्ट अभिनय करत करणारी आणि गेल्या अनेक दिवसांपासून विराट  कोहलीशी लग्न केल्याने चर्चेत असणारी  अभिनेत्री अनुष्का शर्मा  या  दोघांचा ‘सुई धागा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वरून धवन आणि अनुष्का शर्मा यांची मुख्य भूमिका असलेला या चित्रपटाचा  आणखी एक पोस्टर प्रदर्शित झाला  आहे.  ममता आणि मौजी या   मुख्य भूमिकेत अनुष्का- वरुण  दिसणार आहेत. या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.  चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने हा फोटो शेअर केला असून येत्या २८ सप्टेंबर रोजी ‘सुई धागा’ प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे.
मेक इन इंडिया’चा प्रचार या चित्रपटातून करण्यात येणार असल्याचीही  माहिती मिळाली आहे. ‘यश राज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत येणाऱ्या या चित्रपटात वरुण
 धवन  हा टेलरची  भूमिका करत आहे तर अनुष्का  शर्मा भरतकाम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शरत कटारिया करत आहे.
या चित्रपटाची कथा काय असणार हे  याबाबत काहीही माहिती मिळाली नाही.  अतिशय वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट असणार आहे.  त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक यशस्वी  चित्रपटानंतर  वरून आणि अनुष्काचा हा चित्रपट बॉक्स  ऑफिस वर काय कमल करतो ते पाहणे  औत्सुक्याचं  आहे.