Ranbir Kapoor | रणबीरने मारली आलियाच्या लेहंग्याला लाथ; भडकलेले चाहते म्हणले – ‘याच्यासोबत लग्न नको करु’

Ranbir Kapoor | actor ranbir-kapoor-kicked-alia-bhatt-lehanga-in-diwali-party-video-goes-viral-users-asked-her-to-dump-him
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ranbir Kapoor | बाॅलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. अशातच आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) तसेच कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या चर्च्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. आलिया आणि रणबीर कपूर गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तर कतरीना आणि विकीच्या लग्नाची तसेच डेटींगची अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

आलिया भट्ट और रणबीर कपूर

आलिया आणि रणबीर या डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र हे लग्न काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. आलिया आणि रणबीरचा ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra) चित्रपट लवकरच लोकांसमोर येणार आहे. यादरम्यान दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते रणबीरवर भडकले आहेत. तसेच आलियाला रणबीरसोबत ब्रेकअप (Breakup) करण्यास देखील सांगत आहे.

 

समोर आलेला व्हिडीओ हा दिवाळी दरम्यानचा आहे. एक पूजेसाठी आलिया आणि रणबीर एकसाथ गेले होते. यावेळी पायऱ्यांवरुन उतरताना रणबीर आलियाच्या लेहंग्याला लाथ (Kicked) मारुन खाली ढकलताना दिसत आहे. रणबीरच्या या कृतीवर चाहते प्रचंड भडकले असून त्याच्यासोबत लग्न करु नको, असा सल्ला आलियाला दिला आहे.

 

https://www.instagram.com/p/CWQd_H5sUR8/?utm_source=ig_web_copy_link

 

या व्हिडीओमध्ये आलियाने वांगी रंगाचा ल्हेंगा परिधान केला आहे. तर रणबीरने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.

या कार्यक्रमातील त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहे.

आलिया आणि रणबीर या वर्षी एका शूटींगमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच लग्नबाबत विचारल्यावर एक मुलाखतीत जर महामारी आली नसती तर आता पर्यंत लग्न झालं असतं कारण मी लग्नाला तयार आहे,

असं रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) म्हटलं होतं. तर आलिया लग्नाबाबत विचल्यावर ते नेहमीच मला माझं करिअर करायचं असल्याचं म्हणते.

 

https://www.instagram.com/reel/CV–98Vh5S0/?utm_source=ig_web_copy_link

 

Web Title : Ranbir Kapoor | actor ranbir-kapoor-kicked-alia-bhatt-lehanga-in-diwali-party-video-goes-viral-users-asked-her-to-dump-him

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा
Pune Crime | पुण्याच्या मध्यवस्तीत तरुणाचा चाकूने सपासप वार करून खून; मित्र स्वतः हुन पोलिस ठाण्यात हजर

Sitaram Kunte | निवृत्तीनंतर सीताराम कुंटे यांची ‘या’ महत्त्वाच्या पदी नियुक्ती

Maharashtra Rains | पुणे, मुंबई, नाशिकसह कोकणात पाऊस सुरु

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या

Total
0
Shares
Related Posts