रणबीरनं केलं आलियाला KISS, ‘अर्जुन-मलायका’देखील झाले ‘रोमँटीक’, फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आलिया भट आणि रणबीर कपूर तसेच मलयाका अरोरा आणि अर्जुन कपूर हो दोन्ही कपल बॉलिवूडमधील रोमँटीक कपलपैकी एक आहे. अलीकडेच या दोन्ही कपलनं आपले थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत जे सध्या सोशल मीडियायवर चर्चेत आले आहेत.

15 मार्च 2020 रोजी आलिया भटचा वाढदिवस होता. यावेळी नताशा पूनावाला हिनं एक फोटो शेअर केला आणि आलिया वाढिदवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिनं लिहिलं की, बर्थ डे गर्ल. हॅप्पी हॅप्पी बर्थडेय. फोटोत आलिया-रणबीर आणि मलायका-अर्जुन असे कपल दिसत आहेत.चौघंही खूप आनंदात आणि उत्साहात आहेत.

फोटोत दिसत आहे की रणबीर कपूर आलियाच्या गालावर किस करत आहे. त्यांच्या मागेच अर्जुन कपूर मलायकाला किस करताना दिसत आहे. फोटोत नताशा पूनावाला देखील दिसत आहे. हा एक थ्रोबॅक फोटो आहे. यात दोन्ही कपल डबल डेटवर दिसत आहे.

आलिया-रणवीर आणि मलायका-अर्जुनचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चारही कलाकारांच्या चाहत्यांनी त्यांच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी दोन्ही कपलला लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.