Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding | यंदा कर्तव्य आहे ! लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर अडकणार लग्नाच्या बेडीत, ‘या’ ठिकाणी होणार रॉयल वेडिंग !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding | बॉलीवूडमध्ये लगिंसराई चालू आहे. नुकतंच अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल (Vicky-katrina Marriage) यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. बॉलीवूडमधील स्वीट कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. (Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding)

कोरोनाच्या महामारीमुळं रणबीर आणि आलियाच्या लग्नाला थोडा उशीर झाला. परंतु कोरोनाच संकट कमी झालं असतात, ही जोडी आता पुढील टप्प्यावर पोहोचली आहे. आलिया आणि रणबीर आता लग्नाच्या (Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding) तयारीला लागलं असल्याचं समोर येतंय.

 

रणबीर आणि आलियाच लग्न पुढील वर्षी डिसेंबर किंवा 2023 जानेवारीमध्ये करणार असल्याची बातमी समोर आली आहे. तर ही जोडी डेस्टिनेशन वेडिंग करणार नसून मुंबईतच लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नाला भट्ट आणि कपूर फॅमिलीनं अगदी मोजक्या पाहुण्यांना आमंत्रण देण्याचे ठरवले आहे.

आलियाचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि रणवीरच्या कुटुंबातील वयस्कर मंडळी लांबचा प्रवास करू शकणार नाही. त्यामुळे मुंबईतच लग्न करण्याचे ठरवले आहे. तसेच या दोघांचे लग्न ‘ताज लँड्स एंड’ इथं पार पडणार असून, लवकरच दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून चहाते रणबीर आणि
आलियाच्या लग्नाची आतुरतेनं वाट बघत होते. मात्र लवकरच दोघांनी
लग्नाच्या तयारीला सुरुवात केली असून, अद्याप ते दोघं लग्नासाठी
नेमका कोणता लूक करणार आहे हे ठरवलं नाही.


Web Title :-
Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding | bollywood actor ranbir kapoor alia bhatt wedding date venue and other-details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune School Reopan | पुण्यातील 1 ली ते 7 वीचे वर्ग गुरुवारपासून सुरु होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती (व्हिडिओ)

Maharashtra Vidhan Parishad Election 2021 | ‘वा..वा मिटकरी लैच बोलायला लागले’; चंद्रकांत पाटलांचा अमोल मिटकरींना टोला

डायबिटीजच्या रुग्णांनी दूधात ‘या’ 2 गोष्टी मिसळून प्याव्यात, Blood Sugar Level नियंत्रित करण्यासाठी पडतील उपयोगी