…म्हणून युरोपला गेले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपुर्वीच असे समजले की, बॉलिवूडची चर्चेत असलेली जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यूरोपला हॉलीडे एन्जॉय करताना दिसले. खरतर हा हॉलिडे नसून चक्क ते लग्नासाठी युरोपमध्ये जागा पहायला गेले होते. अभिनेत्री आलिया भट्टने एका मुलाखतीत सांगितले की, ‘आम्ही फक्त हॉलीडे एन्जॉय करायला गेलो होतो. लोकांना जे वाटते ते खरे नाही.’

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट याच्या नात्याबद्दल सगळे जाणतात. दोघे नेहमी सोबत दिसून येतात. एका अवॉर्ड फक्शनमध्ये आलियाने रणबीरला ‘आय लव्ह यू’ म्हटले होते. दोघांची केमिस्टी शानदार आहे.

रणबीर आणि आलिया लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रटात झळकणार आहे. त्यांचा हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघेही पहिल्यांदा सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा लोगो लॉंच झाला आहे. चित्रपटाला अयान मुखर्जी डायरेक्ट करणार आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यूरोप हॉलिडे एन्जॉय करायला गेले होते. लगेचच लोकांनी तर्क लावण्यास सुरुवात केली. की दोघे लग्नासाठी जागा पहायला गेले आहे. असे समजले जाते की, इटलीमध्ये दोघेही सीक्रेट लग्नाची प्लॅनिंग करत आहे.