मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सध्या सोशल मिडियाचा वापर खुप होत आहे. प्रत्येकजण सोशल मिडियावर आपले अकाउंट ओपन करत आहे. व त्यावर स्वतःचे फोटो, व्हिडिओ शेअर करत आहे. काहीजणांनी तर सोशल मिडियावर फेक अकाउंट देखील ओपन केले आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूरचे ही नाव शामील आहे. खुद्द रणबीर कपूरने स्वतःचे फेक अकाउंट ओपन केले आहे. ही माहिती बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ हिने दिली आहे.
यावेळी अभिनेत्री कतरिना कैफ म्हणाली की, ”मला माहित आहे की रणबीरकडे फेक अकाउंट आहे. शिवाय, इन्स्टाग्राम कसे वापरावे हे मला रणबीरनेच शिकविले आहे.”एप्रिल २०१७ मध्ये अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मिडियावर आली. ती खुप उशीरा सोशल मिडियावर आली. कतरिनाचे इस्न्टाग्राम अकाउंट ओपन करण्यासाठी तिला तिचा एक्स-बॉयफ्रेंड अभिनेता रणबीर कपूर याने तिला मदत केली होती. याची माहिती कतरिनाने अभिनेता अरबाज खानच्या ‘पिंच’ या कार्यक्रमात दिली.
रणबीर आणि कतरिना चे सात वर्षानंतर ब्रेकअप झाला. त्यांनी ब्रेकअप चे कारण सांगितले की आम्ही एकमेकांना समजून घेण्यात कमी पडलो. सध्या कतरिना सिंगल आहे. रणबीर व आलिया लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. २०१९ मध्ये रणबीर आणि आलियाचे लग्न होण्याची शक्यता आहे. पण कपूर आणि भट्ट कुटुंबीयांकडून या दोघांच्या लग्नाबाबत कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही.