#Video : रणबीर आणि दीपिकाने केले ‘असे’ काही, लोक म्हणाले, दीपिका रणवीरपेक्षा रणबीर कपूर सोबत जास्त खुश दिसते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोड्यांपैकी एक आहे. परंतु आता दापिकाने रणवीर सिंगसोबत लग्न केलं आहे. शिवाय रणबीरही आलिया भट्ट सोबत नात्यात असून त्यांच्या लग्नाच्याही चर्चा आहेत.

अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ फारच वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, रणबीर आणि दीपिका डान्स करत आहेत. या व्हिडीओला एका युजरने कमेंट केली असून या कमेंटचीही फार चर्चा होताना दिसत आहे. या युजरने कमेंटमध्ये म्हटले आहे की, “दीपिका रणवीरपेक्षा रणबीर कपूर सोबत जास्त खुश दिसत आहे.”

या व्हिडीओत रणबीर आणि दीपिका ये जवानी है दीवानी या सिनेमातील एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यात दीपिका फुल ब्लॅकमध्ये दिसत आहे. तर रणबीर ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये दिसत आहे. दोघांना पाहिल्यावर दिसत आहे की, दोघेही फुल मस्ती करत आहेत. ही पहिलीच वेळ नाही, दोघेही ब्रेकअपनंतरही अनेकदा भेटले आहेत. दोघेही जेव्हापण भेटतात आपल्या चाहत्यांना खुश करण्यासाठी काही न काही करत नेहमीच व्हिडीओ सोशलवर शेअर करत असतात.

या दोघांची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना भावत असते. परंतु खासगी आयुष्याबाबत बोलायचे झाले तर हे दोघेही एकमेकांपासून आता खूपच दूर गेले आहेत. दीपिका अनेकदा पती रणवीर सिंगसोबत मस्ती करताना दिसते. तर रणबीरदेखील अनेकदा आलिया सोबत स्पॉट होताना दिसतो.

परंतु आता सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अनेकांना या दोघांना एकत्र पाहून आनंद झाला आहे. तर काहींना त्यांचे एकत्र दिसणे आवडले नाही असे दिसत आहे.