अभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी केले ‘असे’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचारासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत. परंतु सोशल मीडियावर ते नेहमीच सक्रिय असतात. ट्विटरवर ते नेहमीच काही ना काही पोस्ट करत असतात. नुकताच त्यांच्या फॅन क्लबने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात रिद्धिमालाच ऋषी कपूर सांगण्यात आलं होतं. हे पाहून ऋषी कपूर यांनी या पोस्टला रिट्विट करत त्यातील चूक सुधारत त्या फोटोमागील कहाणी सांगितली.

ट्विटर पोस्ट रिट्विट करत ऋषी कपूर यांनी लिहिलं की, “हा मी नाही परंतु माझी मुलगी रिद्धिमा माझ्या वडिलांच्या कडेवर आहे. सगळे लोक घरात हवनसाठी बसलेले आहेत. दुसऱ्या फोटोत जयपूरच्या पद्मापुरी मंदिरात माझा प्रिय मित्र राज बन्सल, लिटिल रणबीर कपूर आणि मी आहे. फक्त तुमच्या माहितीसाठी.”

https://twitter.com/chintskap/status/1139185904097140736

याशिवाय, फिल्म डिस्ट्रीब्युटर राज बन्सल यांनीही फोटोविषयी माहिती दिली आहे. त्यांनीही फोटो शेअर करत लिहिले आहे की, “चिंटूने माझा मुलगा अभिमन्यूच्या पहिल्या वाढदिवशी घरी येण्याचा शब्द दिला होता. नीतू आणि रिद्धिमा देखील सोबत आले होते. या फोटोत जो स्वेटर मी घातला आहे तो मला चिंटूने गिफ्ट केला होता. 30 वर्षांनंतर चिंटू माझ्या मुलाच्या लग्नाला आला होता.

याआधीही ऋषी कपूर यांनी ट्विटरवर पत्नी आणि मुलीसोबत डिनरदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यांच्या या व्हिडीओवरून स्पष्ट होतं की, त्यांच्या तब्येतीत पहिल्यापेक्षा सुधारणा आहे.

You might also like