‘संजू’मधील रोलची ऑफर घेऊन रणबीर कपूर घरी आला होता, ‘या’ कारणामुळं मी नकार दिला, कंगना रणौतचा ‘खुलासा’

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार कंगना रणौत आपल्या बिंधास्त वक्त्वयांसाठी फेमस आहे. कंगनानं संजू सिनेमाबद्दल एक मोठं विधान केलं आहे. कंगनानं सांगितलं की, संजय दत्तचा बायोपिक असलेल्या संजू सिनेमासाठी रणबीर कपूर स्वत: तिच्या घरी एक रोलची ऑफर घेऊन आला होता. परंतु तिला तो रोल न आवडल्यानं तिनं या सिनेमासठी नकार दिला.

एका मुलाखतीत बोलताना कंगनानं सांगितलं की, “संजय दत्तचा बायोपिक संजूमध्ये मला रोल ऑफर झाला होता. संजूमधील रोलसाठी मला विचारण्यासाठी रणबीर कपूर माझ्या घरी आला होता. तो मला आवडला नाही. त्या रोल करण्यासारखं जास्त काही नवहतं. त्यामुळं मी तो रोल करण्यास नकार दिला.”

पुढे बोलताना कंगना म्हणाली, “याशिवाय सुलतान या सिनेमातही मला सलमान खाननं रोल ऑफर केला होता. परंतु या रोलसाठीही मी नकार दिला होता. यानंतर आदित्य चोपडानं मला कॉल केला आणि म्हणाला की, तुझ्यासोबत आता पुन्हा कधीच काम नाही करणार.”

2018 साली आलेल्या राजकुमार हिरानीच्या संजू हा सिनेमा सुपरहिट सिनेमा ठरला. या सिनेमानं वर्ल्ड वाईड 600 कोटींची कमाई केली होती. संजय दत्तच्या जीवनावर आधारीत या सिनेमात संजय दत्तची लाईफ दाखवण्यात आली होती. रणबीर कपूरनं या संजय दत्तचा रोल साकारला होता.

View this post on Instagram

#kanganaranauthot #navel_ #follow navel_z_heavn

A post shared by Navel_z_Heavn (@navel_z_heavn) on

You might also like