अभिनेता रणबीर कपूरचा ‘डुप्लीकेट’ जुनैद शहाचं निधन ! रस्त्यावरून जाताना त्याच्या गळ्यात पडायच्या मुली

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार रणबीर कपूरसारखा दिसणारा मॉडेल जुनैद शाह याचं निधन झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार श्रीनगरच्या इलाही बाग येथील राहत्या घरी कार्डियक अरेस्टमुळं जुनैदनं जगाचा निरोप घेतला आहे.

काश्मिरी पत्रकार युसुफ जमीलनं सोशल मीडियावरून जुनैदच्या निधनाची पुष्टी केली आहे. युसुफ जुनैदच्या घराशेजारीच राहतो. युसुफनं ट्विट केलं होतं की, आमचे शेजारी निसार अहमद शाह यांचा मुलगा जुनैद शाह याचं कार्डियक अरेस्टमुळं निधन झालं आहे.

कोण होता जुनैद ?

जुनैदबद्दल बोलायचं झालं तर तो मॉडेलिंग करत होता. तो हुबेहूब रणबीर कपूरसारखाच दिसत होता. सोशलवर त्याची मोठी फॅन फॉलोविंग होती. त्याचा चेहरा, हाईट, केस, बॉडी शेप सर्वकाही रणबीर कपूरसारखं होतं. त्याची ड्रेसिंग स्टाईलही रणबीरसारखी होती. असंही सांगितलं जात आहे की, तो जर मार्केटमध्ये गेला तर मुली त्याची गळाभेट घेत असत आणि त्याच्यासोबत फोटो काढत असत. खुद्द जुनैदनंही अनेकदा सांगितलं होतं की, लोक त्याला रणबीर कपूर समजत असत. मुली तर त्याच्या मागेच लागत असत. रणबीरचा सावरियां सिनेमा आला तेव्हा जुनैद 17 वर्षांचा होता आणि कॉलेजला होता.

काश्मीर विद्यापीठातून एमबीए करणारा जुनैद मुंबईला रहात होता आणि दीर्घकाळापासून मॉडेलिंग करत होता. त्यानं अनेक ब्रँडसोबत काम केलं आहे. त्याचे वडिल फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि आई अकाऊंटंट आहे.