आलियाच्या सोबतीने रणबीर कपूर करणार साईड बिझनेस : ‘असा’ आहे प्लान !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सध्या अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची जोडी खुप चर्चेत आहे. त्यांच्या लग्नाची चर्चा खुप पसरत आहे. सध्या ते एका चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. पण याचदरम्यान त्यांनी त्यांची एक बातमी सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. ती कोणती ? सविस्तर जाणून घेऊया.

अभिनेता रणबीर आणि आलिया यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपच लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये दोघेही खुप व्यस्त आहे. तरीही रणबीरने साई़ड बिझनेस करण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे याला आलिया भट्ट देखील मदत करणार आहे. रणबीर नेमका कुठला बिझनेस करणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रणबीर क्लोदिंग लाईनमध्ये पैसे गुंतवण्याच्या विचारात आहे. तसाही रणबीर त्याच्या फॅशन सेंससाठी ओळखला जातो. त्याचे चाहते खुप आहे. यामध्ये त्याला बिझनेस योग्य वाटत आहे. सध्यातरी रणबीरच्या क्लोदिंग लाईनचे नाव ठरले नाही. पण २०२० पर्यंत क्लोदिंग लाईनची घोषणेची सगळ्यांना अपेक्षा आहे.

https://www.instagram.com/p/BtJdR4mHdXk/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bp4KTJXg3KR/

याआधी अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, मलायका अरोरा अशा कलाकारांनी स्वतःच्या क्लोदिंग लाईन लॉंन्च केल्या आहे. रणबीरची ‘लेडी लव्ह’ आलिया भट्ट हिन पण स्वतःची क्लोदिंग लाईन लॉंन्च केली आहे. रणबीर देखील याच सहभागी होणार आहे. रणबीर आणि आलिया ‘ब्रह्मास्त्र’चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र झळकणार आहे.

https://www.instagram.com/p/BpT1f3AAC4w/