Ranbir Kapoor | रणबीर कपूरने चित्रपटांमधील भूमिकांबद्दल घेतला मोठा निर्णय; म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन : Ranbir Kapoor | बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे नुकतेच आई-वडील झाले आहेत. मुलीच्या जन्माच्या काही दिवसांनी रणबीर कपूर त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या आगामी प्रकल्पांबद्दल माहिती दिली. (Ranbir Kapoor)

रणबीर कपूर लव रंजनच्या एका रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नाही. या चित्रपटात रणबीर कपूरबरोबर श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच रणबीर म्हणाला की, हा आपला शेवटचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असू शकतो. रणबीरने त्याच्या कारकिर्दीत अनेक रोमँटिक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१७ मध्ये त्याचा शेवटचा ‘जग्गा जासूस’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आला होता. (Ranbir Kapoor)

नुकताच रणबीर कपूर शेवटचा अयान मुखर्जीच्या काल्पनिक महाकाव्य ‘ब्रह्मास्त्र : भाग एक – शिवा’मध्ये
दिसला होता. यामध्ये त्याची पत्नी आलिया भटदेखील मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.

Web Title :- Ranbir Kapoor | ranbir kapoor says i am getting older upcoming luv ranjan film will be his last romantic comedy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Basavaraj Bommai | ‘महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही’ – बसवराज बोम्मई

Mumbai Ahmedabad Bullet Train | मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियंका चोप्राने जागतिक स्तरावर बॉलिवूडवर केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत