Ranbir Kapoor | रणबीर कपूरच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर आउट; होत आहे व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठी रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. रणबीरने नववर्षाच्या मुहूर्तावर मध्यरात्री बारा वाजता ‘ॲनिमल’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. सध्या ह्या पोस्टरने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे. सध्या रणबीरच्या (Ranbir Kapoor) चाहत्यांचे ॲनिमल या चित्रपटाकडे लक्ष लागून आहे.

 

या चित्रपटात रणबीर सोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देखील दिसणार आहे. पहिल्यांदाच रणबीर आणि रश्मिका स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. रणबीरने शेअर केलेल्या ॲनिमलच्या फर्स्ट लूकमध्ये तो खूपच वेगळ्या अवतारात दिसत आहे. आतापर्यंत रणबीरने रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत. त्यातून बाहेर येत रणबीर (Ranbir Kapoor) एक हिंसक अवतारात दिसत आहे. रणबीरने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये दिसत आहे की त्यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे पण तोही पूर्ण रक्ताने माखलेला आहे. तर हातावर जखम देखील आहे. शिवाय त्याच्या काखेत एक कुराड ही दिसत आहे जी देखील रक्ताने माखलेली आहे. वाढलेली दाढी आणि केस त्यासोबत तो सिगारेट लावताना दिसत आहे. सध्या हा पोस्टर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

 

रणबीरच्या (Ranbir Kapoor) पोस्टरचे काहींनी कौतुक केले तर काहींनी टीका केली आहे.
ॲनिमल या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे.
ज्यांनी आजपर्यंत ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबीर सिंग’ सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.
संदीप रेड्डी वंगा यांनी शेअर केलेल्या ॲनिमलचा अनाउन्समेंट व्हिडिओ पाहून हे स्पष्ट होत आहे
की वडील आणि मुलाच्या गुंतागुंतीच्या नात्याची कथा यामध्ये पाहायला मिळणार आहे.
सध्या रणबीरच्या ॲनिमल या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

 

Web Title :- Ranbir Kapoor | ranbir kapoors animal first look release actor looks
violent and fierce in never seen before avatar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा