चेहऱ्याला मास्क लावून मुंबईच्या रस्त्यावरून वेगान सायकल पळवताना दिसला ‘हा’ सुपरस्टार, लोकांनी ओळखलं देखील नाही ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार रणबीर कपूर सध्या चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे त्याचा लेटेस्ट व्हिडीओ. रणबीरचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो सायक्लिंग करताना दिसत आहे. यावेळी त्यानं चेहरा पूर्ण कव्हर केला होता त्यामुळं तो ओळखूही येत नव्हता. सध्या हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे.

रणबीरचा हा व्हिडीओ इंस्टावरून शेअर करण्यात आला आहे. यात तो फुल ब्लू टीशर्ट आणि ब्लॅक लोअरमध्ये दिसत आहे. त्यानं चेहरा कव्हर केला आहे. व्हिडीओत रणबीर खूप स्पीडमध्ये सायकल चालवत जाताना दिसला. काहींनी तर त्याला ओळखलंही नाही. व्हिडीओ समोर आल्यानंतर देखील काही लोकांनीच त्याला ओळखलं आहे. रणबीर खूपच दिवसांनी घरातून बाहेर पडला आहे.

रणबीरचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. काही चाहत्यांनी तर हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे. अजूनही व्हिडीओ सोशलवर पसरत आहे.

रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात काम करताना दिसणार आहे. खास बात अशी की सिनेमात तो गर्लफ्रेंड आलिया भटसोबत काम करणारआहे. याशिवाय रणबीर शमशेरा या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.