Coronavirus Lockdown : ‘या’ मशिदीत पकडले गेले 24 विदेशी मौलवी, पोलिसांनी केली अटक, सर्वांचे पासपोर्ट जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : झारखंडची राजधानी रांचीच्या हिंदपीढ़ी भागात 18 विदेशी मौलवींच्या वास्तव्याच्या माहितीवरून पोलिसांनी प्रत्येकाला ताब्यात घेत क्वारंटाईन केले आहे. पकडलेले सर्व मौलवी ब्रिटिश नागरिक असल्याचे समजते. हिंदपीढीतील एका मोठ्या मशिदीत सर्व परदेशी एकत्र राहिले होते. त्यांच्यासमवेत दिल्लीतील दोन, हैदराबादचा एक आणि रांची येथील दोन तरुणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोरोना विषाणूचा साथीचा संशय आल्याने या सर्व लोकांना रांचीच्या खेलगाव येथील आयसोलेशन केंद्रात हलविण्यात आले आहे.

रांची डी.सी. राय महिमापत राय यांच्या सूचनेवरून हिंदपीढी पोलिस स्टेशनचे एसडीओ व पोलिस मशिदीत वैद्यकीय पथकासह दाखल झाले आणि सर्व परदेशी नागरिकांना क्वारंटाईन केले. सध्या प्रत्येकाबद्दल सविस्तर माहिती गोळा केली जात आहे. त्यांचे पासपोर्ट आणि व्हिसाचीदेखील तपासणी केली जात आहे. चौकशीदरम्यान त्यांनी पोलिसांना सांगितले की, ते सर्वजण परदेशातून तबलीग जमातसाठी आले होते. याची माहिती डीसीना मिळताच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. वैद्यकीय पथकाने सर्व परदेशी लोकांची आरोग्य तपासणीदेखील केली आहे.

रांचीच्या हिंदपीढी मोठ्या मशिदीत परदेशी लपल्याची माहिती मिळाल्यामुळे पोलिस प्रशासनाच्या पथकाने त्यापैकी 24 जणांना ताब्यात घेतले, ज्यात 18 विदेशी लोक होते. सोमवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान पोलिसांनी सर्वांना खेलगाव परिसरातील आयसोलेशनमध्ये हलवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून क्वारंटाईन केले आहे. या परदेशी लोकांमध्ये युनायटेड किंगडम, केनिया, पोलंड, मलेशिया, वेस्ट इंडिजसह भारतातील विविध राज्यांतील लोकांचा समावेश आहे. दोन तरुणही रांचीचे आहेत. कोतवालीचे डीएसपी अजितकुमार विमल यांनी सांगितले आहे की सुरुवातीच्या पडताळणीत सर्व कागदपत्रे बरोबर सापडली असून संशयास्पद असे काही नाही. कोरोनाच्या धोक्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

सर्वांची वैद्यकीय तपासणी
पोलिस प्रशासनाने सर्व परदेशी नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली आहे. सुरुवातीच्या वैद्यकीय तपासणीत कोरानाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. दरम्यान,त्यांना आयसोलेट ठेवत निरीक्षण केले जात आहे. जर सर्व काही ठीक झाले तर पोलिस सर्वांना सोडतील. सध्या एसडीओ सर्व परदेशी नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी करीत आहेत. प्रत्येकाचे व्हिसा-पासपोर्ट आत्तापर्यंत बरोबर सापडले आहेत.