हॉस्पीटलमध्ये असलेल्या लालू यादवांना किडनी देण्यासाठी 2 कार्यकर्ते ‘उत्सुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथे रिम्स हॉस्पिटलमध्ये भरती असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्या खराब किडनीमुळे त्यांचे कुटुंबीय अनेक दिवसांपासून काळजीत आहेत. लालू यादव यांच्यासाठी आता त्यांच्या दोन कार्यकर्त्यांनी किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अनेक वर्षांपासून लालू यादव यांचे कार्यकर्ते असलेले सुरेंद्र यादव आणि इरफान अंसारी यांनी किडनी देण्याची घोषणा केली आहे. सुरेंद्र यांनी जेल अधिकाऱ्यांना याबाबत लेखी सुद्धा देऊ शकतो असे सांगितले आहे तर अंसारी यांनी मी स्वतः आणि माझ्या कुटूंबातील अनेक लोक लालू यादव यांना किडनी देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे.

लालू यादव यांची ३७ % किडनीच कार्यक्षम
चारा घोटाळ्याच्या प्रकरणावरून जेल मध्ये असलेले लालू यादव हे आजारी असल्यामुळे रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. त्यासोबतच लालू वेगवेगळ्या १५ आजारांनी ग्रासलेले आहेत. ६३ टक्के किडनी खराब झालेली असल्यामुळे ३७ टक्केच किडनी कार्यक्षम असल्याचे समजते असे असूनही मात्र डॉक्तरांनी त्यांना किडनी ट्रान्सप्लांट किंवा कोणत्याही निदानाची गरज नसल्याचे सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –