Coronavirus : 3 प्राणायाम अन् 5 औषधींमुळं कधीच होणार नाही ‘कोरोना’, बाबा रामदेव यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेथे संपूर्ण देशात आणि जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे, तेथे पतंजली योगपीठाचे योग गुरु बाबा रामदेव यांनी सांगितले की, कोरोनामुळे भारताच्या लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. नियमित योग आणि आयुर्वेद वैद्यकीय पद्धतीच्या माध्यमातून कोरोनाशी लढू शकतो. बाबा रामदेव यांनी सांगितले की प्राणायाम आणि पाच औषधीय सामग्रीच्या सेवनाने कोरोना कायमस्वरूपी दूर होऊ शकतो. यावेळी रामदेव बाबा कोडरमा मधील मरकच्चो येथे आयोजित ११ दिवसीय महायज्ञात सामील होण्यासाठी गेले होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना रामदेव बाबांनी सांगितले की कोरोना विषाणूला घाबरण्याचे कारण नाही. त्यांनी सांगितलं की प्राणायामचा नियमित अभ्यास करावा आणि त्याबरोबरच हळद, काळी मिरी, गिलोय, आले आणि तुळस यांचा काढा करून नियमितपणे सेवन केल्यास कोरोना विषाणूचा हल्ला कधीच होणार नाही. जर विषाणूचे संक्रमण झालेच तर सकाळी आणि सायंकाळी हा काढा सेवन करावा.

बाबा रामदेव म्हणाले की कोरोना विषाणूची लक्षणे ज्यांच्यात दिसत आहेत, त्यांनी सकाळी आणि संध्याकाळी गिलोयचे सेवन करावे म्हणजे हा विषाणू दूर केला जाऊ शकतो. तसेच त्यांनी सांगितले की लोकांना कोरोना विषाणूची भीती बाळगण्याची गरज नाही. याचा सामना करण्यासाठी योग हा एक उत्तम आणि सोपा मार्ग आहे. योगासनाद्वारे कोरोना विषाणूचा नाश होऊ शकतो.