‘मदरशात आणि गुरूकूलमध्ये एकाच वेळी छापेमारी करा, पाहा कुठं मिळातात हत्यारं’ : योगगुरू बाबा रामदेव

रांची : पोलीसनामा ऑनलाइन – योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटले आहे की, देशात दहशतवाद्यांची संख्या वाढत आहे. काही लोक पतंजली योगपीठाच्या आचार्यकुलमला हिंदू मदरसा म्हणत आहेत, जर असे असेल तर भारतातील सर्व मदरसे आणि गुरूकुल मंदिर यांच्यावर एकाचवेळी छापेमारी व्हावी. मी विश्वासाने सांगतो की, हिंदू मंदिरातून कोणतेही शस्त्र सापडणार नाही. शाहीनबागमध्ये सीएए विरोधात रस्ता आडवून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत रामदेव म्हणाले, मी कोणत्या एका व्यक्तीला शाहीनबागसाठी जबाबदार धरत नाही.

बाबा रामदेव म्हणाले, विचारधारा, धार्मिक विश्वास, आस्थेच्या नावावर देशात जे विष पेरले जात आहे, तेच शाहीनबागचे मुळ कारण आहे. आपसातील विष दूर करण्याची गरज आहे. हिंदू-मुस्लीम हिंसेच्या नावाखाली देशात फूट पाडू नये. मी सुद्धा हिंदू आहे, मी घाबरत नाही, आणि घाबरवत नाही. काही लोक म्हणतात की, भारतात मला भिती वाटते. हा देश 125 करोड भारतीयांचा आहे. येथे कोणताही धर्म धोक्यात नाही. धोक्यात ते लोक आहेत ज्यांना देशात फूट पाडायची आहे. काहींचे म्हणणे आहे की, आमच्यासोबत दुय्यम व्यवहार होत आहे. हे बरोबर नाही. भारत संविधानानुसार चालणारा देश आहे. आमच्या धार्मिक आस्थेमुळे कोणाला त्रास होणार नाही.

70 टक्के भारतीय तरूण पाहतात पॉर्न
बाबा रामदेव म्हणाले, आज 70 टक्के भारतीय तरूण पॉर्न पाहतात. आपला देश पॉर्न हब बनला आहे. यासाठी मुलांवर संस्कारांची गरज आहे. मॉडर्न सब्जेक्टसाठी, वैदिक विषयासाठी, योगा आणि शिस्तीसाठी आचार्यकुलममध्ये एक्सपर्ट आहेत. स्ट्रक्चरपासून कॅरेक्टरपर्यंत येथे बनते. आता ग्रामीण आणि शहरी भागातील मुले या शाळेत शिकत आहेत. लवकरच ही शाळा देशातील टॉप 5 शाळांपैकी एक असेल. आचार्यकुलमवर बाबा रामदेव म्हणाले, हा एक वर्षाचा एक प्रयोग आहे, ज्याचा प्रभाव मुलांवर दिसत आहे. शिक्षण, भाषा आणि तंत्रज्ञानाशिवाय शिस्त-एकाग्रता जरूरी आहे. यामुळे शारीरीक आणि बौद्धिक विकास होतो. शिक्षण, योग आणि चांगल्या सवयी शिकवल्या जातात.

शाहीनबाग प्रकरणावर बाबा रामदेव म्हणाले, देशात दहशतवाद्यांची संख्या वाढली आहे. अर्बन नक्षल, धर्म जातीच्या नावावर राजकीय उद्देशाने यास प्रोत्साहन दिले जात आहे. हा वैचारिक दहशतवाद आहे. आक्रमक व्हा, परंतु देशाच्या विकासासाठी व्हा. एकमेकांशी लढण्यासाठी आक्रमक होऊ नका. देशात वैचारिक दहशतवाद, धार्मिक उन्माद आणि अंध राष्ट्रवाद आणि जातीयवाद होऊ नये. देशासाठी प्राण देणारे तरूण राष्ट्रवादासाठी तयार व्हावेत. याची सुरूवात करण्यासाठी आचार्यकुलमची स्थापना केली आहे.

योगगुरु बाबा रामदेव शनिवारी सुमारे 12 वाजता रांचीमध्ये पोहचले. पतंजली योगपीठ संचालित आचार्यकुलममध्ये सुमारे तीन तास होते. यादरम्यान त्यांनी भावी योजना समजावून सांगितल्या. योगगुरुंच्या स्वागतासाठी आचार्यकुलममध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. योग, प्राणायाम आणि शिस्त जीवनासाठी अनिवार्य असल्याचे बाबा रामदेव यांनी यावेळी सांगितले.