घृणास्पद ! बापानं मुलगी मानून घरी नेलं, पोरानं सलग ८ महिने केला बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या बक्सरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका १५ वर्षीय  अल्पवयीन  मुलीवर रांचीमध्ये सतत ८ महिने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी  पिता पुत्राला अटक केली असून बजरंग साह आणि मुन्ना साह असे या पितापुत्राचे नाव आहे. बजरंग साह याचे हॉटेल असून यामध्ये  मुन्ना साह हा काम करत आहे.

मुलगी म्हणून आणले होते घरी

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार ८ महिन्यांपूर्वी आईबरोबर भांडण करून ती बिहारमधल्या बक्सरमधून पलायन केले होते. त्यानंतर ती  हटिया स्टेशन येथे आली. तेथे तिला बजरंग साह भेटला. त्याने मला मुलगी नसून तू तुझ्याबरोबर चल, म्हणून तिला घरी घेऊन आला. सुरुवातीला काही दिवस सुरळीत होते. मात्र एक दिवस अचानक त्याच्या मुलाने तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर सलग ८ महिने तिच्यावर हे अत्याचार करण्यात आले.  तिने या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तिला यश येत नव्हते. अखेर एक दिवस ती पळून जाण्यात यशस्वी ठरली आणि तिने थेट पोलीस ठाणे गाठत या प्रकारची तक्रार दाखल केली.

दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बजरंग साह आणि मुन्ना साह याला अटक केली असून  पोडितेच्या घरच्यांना याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास सुरु असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like