FB वर ‘जातीयवादी’ पोस्ट केल्याने कोर्टाकडून ‘हिंदू’ मूलीला ‘कुराण’ वाटण्याची शिक्षा, मुलीचा नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी अनेक जणांना शिक्षा देण्यात येत असते. मात्र रांचीतील दिवाणी न्यायालयाने फेसबुकवर धार्मिक वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी अनोखी शिक्षा सुनावली आहे. ही वादग्रस्त पोस्ट टाकल्या प्रकरणात न्यायालायने या विद्यार्थिनीला शिक्षा म्हणून मुस्लिम धर्मग्रंथ कुराण वाटण्यास सांगितले.

या मुलीला न्यायालयाने या प्रकरणात जामीन दिला. मात्र, जामीन देताना तिला कुराणाच्या पाच प्रति वाटण्याचे आदेश देखील देण्यात आले. मात्र यानंतर आता या निकालावर हिंदू संघटनांनी नाराजी दर्शवत कोर्टाच्या निर्णयावर टीका केली आहे.

यासंदर्भात स्थानिक भाजप नेत्यांनी देखील न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. रिचा भारती नावाच्या या मुलीने काही दिवसांपूर्वी मॉब लीचिंगच्या मुद्द्यावर फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्यावेळी तिच्या विरोधात धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला जामीन मंजूर करतानाच कुराणच्या पाच प्रतीचे वाटप करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या मुलीच्या वकिलांनी या गोष्टीची हमी घेत पुढील १५ दिवसात याचे पालन करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले आहे. यातील एक प्रत अंजुमन इस्‍लामिया कमिटीला आणि बाकीच्या चार प्रति या विविध शाळा आणि कॉलेजमध्ये देण्यात सांगण्यात आल्या आहेत.

दरम्यान, रिचा भारती ही कॉलेज विद्यार्थिनी असून ती पहिल्या वर्गात शिकत आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर तिने नाराजी व्यक्त करत महटले की, याअगोदर देखील अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडले आहेत. त्यांना त्यावेळी हनुमान चालीसा आणि गीता वाचण्यास का सांगितले नाही. त्यामुळे आपण हे काम करणार नाही असे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आता तिच्या या ठाम भूमिकेवर न्यायालय काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी