MS धोनी सलग तिसर्‍यांदा बनला झारखंडमध्ये वैयक्तिकरित्या सर्वात मोठा ‘कर’दाता

रांची : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आणखी एक कमाल केली आहे. झारखंड राज्यामध्ये सर्वात मोठा वैयक्तिक कर भरण्यामध्ये त्याने हॅट्रिक केली आहे. सीसीएलने राज्य आणि कंपन्यांमध्ये सर्वाधिक कर भरला आहे. सीसीएल ने एकूण १०० कोटी रुपये कर भरला आहे. सर्वाधिक कर भरणाऱ्यांमध्ये सीसीएल पहिल्या व धोनी दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत झारखंड राज्य पेय निगम तिसऱ्या स्थानी असून त्यांनी १०.५० करोड इतका कर भरला आहे.

मोठ्या करदात्यांच्या यादीत आहे चौथ्या स्थानावर
आयकर विभागाने राज्यातील सर्वाधिक कर भरणाऱ्या ९ जणांची यादी जाहीर केली असून, धोनी त्या यादीत ४ थ्या स्थानावर आहे. पण वैयक्तिक कर भरणाऱ्या यादीत धोनी हा पहिल्या स्थानावर आहे. सुरक्षेच्या कारणावरून धोनीने किती कर भरला ते आयकर विभागाने जाहीर केलेले नाही.

राज्यात सर्वाधिक कर भरलेल्या यादीत बिग शॉप पाचव्या, कश्यप मेमोरियल डोळ्यांचे रुग्णालय सहाव्या स्थानी तर, कोचिंग संस्थान ब्रदर्स हे सातव्या स्थानावर आहेत. प्रधान आयुक्त रांची शुल्क क्षेत्रातील दहा मोठ्या करदात्यांमध्ये झारखंड सरकारच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनचे पाचवे स्थान आहे. राज्यातील सर्वात मोठी कंत्राटदार राम कृपाल कन्स्ट्रक्शन कंपनी सातव्या क्रमांकावर आहे.

राज्यातील सर्वात मोठ्या करदात्यांची यादी

1 सेंट्रल कोल फील्ड लिमिटेड, रांची

2 महेंद्रसिंग धोनी, रांची

3 टिमकेन इंडिया लिमिटेड, जमशेदपूर जेमीपोल लिमिटेड, जमशेदपूर

4 बिग शॉप, रांची

5 कश्यप मेमोरियल आय हॉस्पिटल, रांची

6 ब्रदर्स अकॅडमी, रांची