पत्नीचे ‘शौक’ पूर्ण करता-करता पती झाला ‘कंगाल’, मग झाल असं…

रांची : पोलीसनामा ऑनलाइन –    झारखंडची राजधानी रांचीमध्ये फॅमिली कोर्टासमोर एक अजब प्रकरण आले आहे. पत्नीचे शौक पूर्ण करता-करता एक पती कंगाल झाला, इतका की आता रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. पत्नीचे शौक पूर्ण होत होते, तोपर्यंत सर्वकाही ठिक होते, परंतु जेव्हा पत्नीचे शौक पूर्ण करणे कमी झाले, तेव्हा ती थेट फॅमिली कोर्टात पोहचली. इतकेच नव्हे, या महिलेने आपल्या पतीकडे पोटगी मागत फॅमिली कोर्टात खटला दाखल केला आहे.

असा झाला कंगाल, आणि आला रस्त्यावर

पत्नीचे शौक पूर्ण करण्यासाठी पतीला काय-काय करावे लागते, याचे ताजे प्रकरण झारखंडची राजधानी रांचीमध्ये घडले आहे. येथील अमित (बदललेले नाव) ने कुटुंबाच्या संमतीने 2004 मध्ये आपली प्रेयसी अर्चनाशी (बदललेले नाव) लग्न केले. काही वर्षांनंतर दोघांना एक मुल सुद्धा झाले. बायकोचे महागडे आणि किंमती कपडे आणि शहरातील मोठ-मोठ्या हॉटेलमध्ये जेवणाचा शौक पूर्ण करता-करता अमित कर्जदार होत गेला. अमितने मागच्या 8-9 वर्षात पत्नीचे शौक पूर्ण करण्यासाठी 23 लाख रुपयांचे कर्ज घेतले. कर्जामुळे तो तणावात राहू लागला आणि एक दिवस असा आला की त्याची नोकरीसुद्धा गेली.

जेव्हा अमितने आपल्या पत्नीला सांगितले की, आता मी तुझे शौक पूर्ण करू शकत नाही, तेव्हा प्रकरण बिघडले…आणि अर्चना थेट न्यायालयात पोहचली. अर्चनाने तिच्यासाठी आणि तिच्या मुलाच्या संगोपनासाठी पोटगीची मागणी करत फॅमिली कोर्टात खटला दाखल केला. अर्चनाचे म्हणणे आहे की, तो यापूर्वी आमच्या मागण्या पूर्ण करत होता, मगा आता का नाही करू शकत? आता न्यायालयाने दिलेल्या प्रत्येक तारखेला अर्चना न्यायालयात मुलासोबत हजर राहते आणि पोटगीची मागणी करते.

सर्व संपले तरी तिला खरे वाटत नाही

अमितने अर्चनाचे शौक पूर्ण करण्यासाठी आपले वारसा हक्काचे घर सुमारे 1.40 करोड रूपयांना विकले. अमितचे दोन भाऊ असल्याने वाटणीत त्याला 70 लाख रूपये मिळाले. 23 लाखांचे कर्ज चुकवल्यानंतरही त्याच्या हातात 47 लाख रूपये वाचले होते. 47 लाख रुपयेसुद्धा त्याने पत्नीचे शौक पूर्ण करण्यात उडवले. तरीही पत्नीच्या मागण्या काही कमी होत नव्हत्या. यानंतर अमितने हात वर केले, तेव्हा अर्चनाने न्यायालय गाठले. आता इतके वर्षांचे त्यांचे नाते तुटण्याची शक्यता आहे.

न्यायालय प्रयत्न करत आहे की, दोघांचे नाते पुन्हा सामान्य व्हावे आणि अमित-अर्चना यांनी पुन्हा एकत्र जीवन सुरू करावे. अमित एका सेवानिवृत्त अधिकार्‍याचा मुलगा आहे. कुटुंबाच्या संमतीने त्याने आपल्या प्रेयसीसोबत 2004मध्ये लग्न केले होते. अमितला जेवढा पगार मिळत होता, त्यापेक्षा जास्त तो पत्नीचे शौक पूर्ण करण्यासाठी उडवत होता, ज्यामुळे त्याच्यावर आज ही वेळ आली आहे.