धक्कादायक ! यात्रेत लहान मुलांच्या मृतदेहाचे ‘प्रदर्शन’ ; तपासानंतर झालं ‘असं’ काही, जाणून घ्या

रांची : वृत्तसंस्था – रांची येथील ऐतिहासीक जगन्नाथपुरी रथ यात्रेमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जगन्नाथपुरी रथ यात्रेमध्ये नवजात मृत बालकांच्या मृतदेहाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.

शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलीस देखील चक्रावून गेले. भरवण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये खऱ्या मुलांचे मृतदेह ठेवण्यात आले होते. याप्रकरणान चार जणांना अटक करण्यात आली आहे.

जगन्नाथपुरी रथ यात्रेमध्ये कोलकत्ता येथील काही लोक सहभागी झाले होते. या लोकांनी नवजात आणि अविकसीत मुलांच्या मृतदेहाचे नमुने बाटली आणि टबमध्ये ठेवले होते. त्यांनी याचे प्रदर्शन भरवून लोकांना ते दाखवत होते. प्रदर्शन बघण्यासाठी त्यांनी तिकीट ठेवले होते. अनेक लोकांनी तिकीट काढून हे प्रदर्शन पाहिले. काही लोकांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी गांभीर्य़ ओळखत घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. त्यानंतर हे सर्व मृतदेह राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले. शवविच्छेन अहवालानुसार हे खरोखरचे मृतदेह असल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला. पोलिसांनी चार जणांना अटक करून त्यांच्याकडे कसून चौकशी केली.

अटक करण्यात आलेले आरोपी हे कोलकत्ता येथून आले होते. नवजात बालकांचे मृतदेह दाखवून पैसे कमावण्याचा त्यांचा उद्देश होता. पोलिसांनी त्यांच्याकडून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडे असलेल्या बालकांचे मृत्यू कसे आणि कधी झाले हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांकडून पकडण्यात आलेल्या चार आरोपींची चौकशी सुरु असून बालकांचा मृत्यू कशामुळे आणि कधी झाला याचा शोध घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या