लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली, फक्‍त 37 % काम करते किडनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची प्रकृती जास्त बिघडली आहे. रांचीमधील रिम्समध्ये उपचार घेत असलेल्या लालूप्रसाद यांचा वैद्यकीय अहवाल आज हॉस्पिटलने प्रकाशित केला. यामध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यात आली असून येथील डॉक्टर डी.के.झा यांनी सांगितले कि, सध्या त्यांची प्रकृती जास बिघडली असून त्यांच्या पायावर झालेल्या एका मोठ्या जखमेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना अँटिबायोटिक देण्यात आले आहे.

लालू प्रसाद यादव की किडनी 50 फीसदी से घटकर 37 फीसदी कर रही काम

किडनी फक्त 37 टक्के काम करत आहे –

त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले कि, त्यांच्या रक्तात इन्फेक्शन झाले असून रक्तदाब देखील मोठ्या प्रमाणात कमी जास्त होत आहे. त्यांच्या पायावर झालेल्या जखमेने पुन्हा डोके वर काढले असून त्यावर देखील संक्रमण होत आहे. त्यामुळे त्यांच्या उपचारामध्ये अडथळे येत आहेत. त्याचबरोबर त्यांची एक किडनी सुरुवातीला 50 टक्के काम करत होती. मात्र आता ती किडनी फक्त 37 टक्के काम करत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

किडनीचे संक्रमण वाढले –

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव यांची तब्येत सतत खालावत असून त्यांना चालायला देखील त्रास होत आहे. त्यांच्या प्रकृतीवर एक टीम लक्ष ठेवून असून त्याची एक किडनी व्यवस्थित काम करत नाही. लवकरच ठीक होण्याची डॉक्टरांना देखील आशा आहे.

आरोग्यविषयक वृत्त –